भारतात इंटरनेटचा स्पीड इतर देशांच्या तुलनेत मंदावत असल्याचे समोर आले आहे. ब्राॅडब्रॅण्ड स्पीडबाबत भारत पहिल्या 100 देशातही नाही. भारतात एकीकडे 5G इंटरनेटची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 5G इंटरनेटमुळे देशातील मोबाईल इंटरनेटमध्ये क्रांती येईल, असे दावे केले जात आहेत. दुस-या बाजूला भारतात सध्या वापरात असलेल्या इंटरनेटचा वेग कमालीचा मंदावला असल्याचे समोर आले आहे. वेगवान इंटरनेट असणा-या देशांच्या यादीत पहिल्या 100 देशांतही भारताचा समावेश नाही. भारतात इंटरनेटचा स्पीड इतर देशांच्या तुलनेत मंदावत असल्याचे समोर आले आहे.
ग्लोबल स्पीड टेस्ट एजन्सी Ookla ने इंटरनेट स्पीडबाबत एक अहवाल जारी केला आहे. ग्लोबल इंटरनेट स्पीडच्या यादीत ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात भारताची पिछेहाट झाली आहे. ब्राॅडब्रॅण्ड आणि मोबईल इंटरनेट या दोन्हीच्या वेगात भारताची घसरण झाली आहे. सप्टेंबर महिन्यात ब्राॅडब्रॅण्ड वेगाबाबत भारत 117 व्या स्थानाहून 118 व्या स्थानावर आला आहे. मोबाईल इंटरनेट स्पीडबाबत भारत 78 व्या स्थानावरुन 79 व्या स्थानावर आला आहे.
( हेही वाचा: हलाल उत्पादनांची सक्ती का? ट्विटरवर सुरू आहे ‘हलालमुक्त दिवाळी’ ट्रेंड )
मोबाईल इंटरनेट स्पीडमध्येही भारत मागे
ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात भारतातील मोबाईल डाऊनलोड स्पीड चांगला झाला आहे. ऑगस्ट महिन्यात मोबाईल डाऊनलोड स्पीड 13.52 Mbps इतका होता. सप्टेंबर महिन्यात यात वाढ होऊन तो 13.87Mbps इतका झाला आहे. इंटरनेट स्पीडच्या बाबतीत नाॅर्वे देश पहिल्या स्थानावर आहे. मोबाईल इंटरनेटचा स्पीड नाॅर्वेमध्ये सर्वाधिक आहे.