सावधान! CoWIN पोर्टलवरील तुमचा डेटा असुरक्षित? आरोग्य यंत्रणेवरील सायबर हल्ल्यांमध्ये वाढ

जगात भारत दुसऱ्या क्रमांकावर

116

भारत सरकार सध्या डिजिटलायझेशनला चालना देत आहे. मात्र आरोग्य यंत्रणेवरील सायबर हल्ल्यांमध्ये भारत जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशात अद्याप डेटा संरक्षण कायदा नसतानाही आरोग्य सेवा क्षेत्रातं डिजिटलायझेशन मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. भारत सरकारकडून कोरोना महामारीकाळात केविन अॅप, आरोग्य सेतू यासारखे अॅप निवडण्यात आले. एकीकडे भारत डिजिटल इंडिया बनण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यावरील होणारे सायबर हल्ले देखील चिंतेचा विषय बनत आहे.

(हेही वाचा – ‘बेस्ट’च्या ५ आगारांतील ‘मिनी’ बससेवा ठप्प, प्रवाशांची गैरसोय)

२०२१ मध्ये भारत सरकारने कोरोना विरूद्ध लसीकरणाचा विक्रम करण्यासाठी केविन पोर्टल आणि अॅप वापरण्यास सुरूवात केली. यादरम्यान, आरोग्य यंत्रणेवरील सायबर हल्ल्यांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी आहे. CloudSEK या सायबर धोक्यांबद्दल सांगणाऱ्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कंपनीने 18 ऑगस्ट रोजी एक अहवाल प्रसिद्ध केला. यामधून ही माहिती समोर आली आहे.

लसीकरण नोंदणी किंवा कोविन अॅप यासारख्या आरोग्य सेवेसंबंधित पोर्टलवर अनेक नागरिकांचा डेटा उपलब्ध आहे. यामध्ये नाव, पत्ता, ईमेल, मोबाईल नंबर यासारख्या वैयक्तिक माहितीचा समावेश आहे. वेळीच योग्य उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठा सायबर हल्ला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या हल्ल्यांचे प्रमाण वाढल्यास हॅकर्सकडून नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ शकतो आणि हा चिंतेचा विषय आहे. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये आरोग्य यंत्रणेवरील सायबर हल्ले होणाऱ्या यंत्रणेमध्ये भारत दुसऱ्या स्थानी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सायबर हल्ल्यांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर 2021 च्या तुलनेत 2022 वर्षाच्या पहिल्या 4 महिन्यांत आरोग्य यंत्रणेवरील सायबर हल्ल्यांमध्ये 95.35 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.