देशात पहिल्यांदाच जम्मू- काश्मीरमध्ये लिथियमचा मोठा साठा आढळून आला आहे. लिथियमचा साठा आढळून आला आहे. लिथियमचा साठा आढळून हा पहिलाच प्रदेश आहे आणि भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणाने रियासी जिल्ह्यात पुष्टी केली आहे. इलेक्ट्रिक वाहने आणि मोबाईल फोनसारख्या उपकरणांमध्ये जी बॅटरी वापरली जाते त्यात लिथियमचा वापर केला जातो. सध्या भारताला लिथियम इतर देशांकडून आयात करावे लागते. जम्मू- काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात आढळलेल्या साठ्यामुळे आता देशाचे आयातीवरील अवलंबीत्व कमी होणार आहे.
‘या’ अकरा राज्यांत आढळून आली खनिज संपत्ती
51 खनिज ब्लाॅक्सपैकी 5 ब्लाॅक्स सोन्याशी संबंधित आहेत. याशिवाय पोटॅशिअम, मोलिब्डेनम, बेस मेटलशी निगडीत खनिज संपत्ती आढळून आली आहे. ही खनिज संपत्ती 11 राज्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात आढळून आली आहे. या राज्यांमध्ये जम्मू- काश्मीर, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, तामीळनाडू आणि तेलंगणा राज्यांचा समावेश आहे, अशी माहिती खणीकर्म मंत्रालयाने दिली आहे.
( हेही वाचा: चीनचे मोठे षड्यंत्र; 40 देशांमध्ये सोडले ‘स्पाय बलून’ )
Join Our WhatsApp Community