भारत कुवेतला १९२ मेट्रिक टन शेण निर्यात करणार! भारतात मात्र सेंद्रिय खताकडे पाठ

भारत कुवेतला १९२ मेट्रिक टन शेण निर्यात करत आहे, कारण कुवेतमध्ये मोठ्या प्रमाणात सेंद्रीय शेतीची मागणी वाढली आहे, असे ऑरगॅनिक फार्मर प्रोड्युसर असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. अतुल गुप्ता यांनी सांगितले. कस्टम विभागाच्या देखरेखीखाली श्रीपिंजरापोल गोशाळेच्या सनराईज ऑरगॅनिक पार्कमध्ये शेणाच्या नैसर्गिक खताचे पॅकेजिंग करण्यात आले आहे. पहिली खेप १५ जून रोजी कनकपुरा रेल्वे स्थानकावरून निघेल. तेथून ही खेप गुजरातमधील मुंद्रा बंदरात पोहोचेल आणि त्यानंतर कुवेतला पाठवली जाईल.

ब्रिटनमध्ये शेणापासून दरवर्षी 60 लाख युनिट वीज तयार होते  

भारतीय कृषी क्षेत्रामध्ये पशुजन्य उत्पादनांची निर्यात हे महत्त्वाचे योगदान आहे. प्राण्यांच्या उत्पादनांच्या निर्यातीत मांस, पोल्ट्री उत्पादने, प्राण्यांची चामडी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आणि मध यांचा समावेश होतो. 2020-21 मध्ये, भारतातील पशु उत्पादनांची निर्यात 27,155.56 कोटी रुपये होती. अलीकडे शेणखताचीही निर्यात होत असल्याने सेंद्रिय खतांची मागणी झपाट्याने वाढत आहे. सनराईज ऑरगॅनिक पार्कचे डॉ. गुप्ता म्हणाले की, भारतात गुरांची संख्या सुमारे 300 दशलक्ष आहे. दररोज सुमारे 30 लाख टन शेणखत तयार होते. ब्रिटनमध्ये शेणापासून दरवर्षी 60 लाख युनिट वीज तयार केली जाते, तर चीनमध्ये 15 कोटी घरांना वीजपुरवठा केला जातो. घरगुती ऊर्जेसाठी गोबरगॅसचा वापर केला जातो.

हे देश शेणखत आयात करतात 

गाईचे शेण हे खत म्हणून खूप उपयुक्त आहे. ते वाढीस उत्तेजक आहे… परदेशी लोकांना शेणाचे महत्त्व चांगलेच समजले आहे. याचा परिणाम म्हणजे अनेक देशांनी त्याचा वापर सुरू केला आहे. शेणापासून बनवलेले सेंद्रिय खत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यांच्याकडे पुरेसे शेण उपलब्ध नसल्याने त्यांनी भारतातून शेणापासून बनवलेले सेंद्रिय खत (वर्मी कंपोस्ट) आयात करण्यास सुरुवात केली आहे.विशेषतः अमेरिका, नेपाळ, केनिया, फिलीपाईन्ससारख्या देशांत भारतातून दरवर्षी लाखो टन सेंद्रिय खते मागवायला सुरुवात केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here