व्हिएतनाम बरोबर स्थानिक चलनात व्यवहार करण्यासाठी भारताने चर्चा केली सुरू

भारत आणि व्हिएतनाम दरम्यान व्यापार विषयक सहमती करार करण्यासाठी सध्या वाटाघाटी सुरू आहेत

215
व्हिएतनाम बरोबर स्थानिक चलनात व्यवहार करण्यासाठी भारताने चर्चा केली सुरू
व्हिएतनाम बरोबर स्थानिक चलनात व्यवहार करण्यासाठी भारताने चर्चा केली सुरू
  • ऋजुता लुकतुके

भारताच्या सर्वंकष व्यापार धोरणाचा महत्त्वाचा भाग आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापारात रुपया किंवा स्थानिक चलन वापरणं. त्यादृष्टीने आता व्हिएतनाम बरोबर चर्चा सुरू झाली आहे. भारत आणि व्हिएतनाम दरम्यान व्यापार विषयक सहमती करार करण्यासाठी सध्या वाटाघाटी सुरू आहेत. आणि अशाच एका चर्चेदरम्यान भारताने व्हिएतनाम समोर स्थानिक चलनात व्यवहार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ८ ऑगस्टला नवी दिल्लीत ही पहिली फेरी पार पडली.

व्हिएतनाम हा भारताचा जुना व्यापारी मित्र आहे. आणि निर्यातीचं प्रमाण लक्षात घेता पाचवा मोठा व्यापार भागीदार देश आहे. माहिती-तंत्रज्ञान, सेवा, शिक्षण, आरोग्य, आरोग्य सेवांसाठी पर्यटन, अर्थविषयक सेवा तसंच कृषि अशा विविध क्षेत्रांमध्ये मिळून २ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी गुंतवणूक भारताने या देशात केली आहे.

आता व्यापारी मैत्रीचा पुढचा टप्पा म्हणून हे व्यवहार स्थानिक चलनात व्हावेत असं भारताचं आग्रहाचं म्हणणं आहे. भारताला रुपे या भारत सरकारचं कार्ड जगभर पोहोचवायचं आहे. शिवाय युपीआय तसंच इतर क्यूआर कोड प्रणालींमार्फत स्थानिक चलनात व्यवहार व्हावेत असं भारताचं म्हणणं आहे. यातून दोन्ही देशांचं परकीय चलनही वाचेल. आणि ऑनलाईन पेमेंट प्रणालींचा जागतिक स्तरावर विकार होईल.

भारताचं नवं रुपया बळकटीकरणाचं धोरण

अलीकडेच भारताने संयुक्त अरब अमिराती सरकारबरोबर स्थानिक चलनाच्या वापरासाठी सामंजस्य करार केला आहे. इंडोनेशिया बरोबर तशी बोलणी सुरू आहेत. यातून भारताचा उद्देश आहे तो रुपयाच्या बळकटीकरणाचा. रुपयाला जागतिक चलन म्हणून मान्यता मिळावी आणि भारतात वापरली जाणारी क्यू आर कोड पेमेंट पद्धती जगभर वापरली जावी हा भारताच्या द्विराष्ट्रीय व्यापार धोरणाचाच एक भाग आहे.

भारताने जगाला देऊ केलेली ही एक वित्तीय सेवा आहे. आणि या प्रणालीच्या विकासासाठी भारताचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. त्यादृष्टीने मित्र देशांबरोबर नव्याने व्यापारी करार करण्याचे भारताचे सुरुवातीचे प्रयत्न आहेत. भारत आणि व्हिएतनाम दरम्यान गेल्यावर्षी बोलणी सुरू झाली होती. त्यानुसार, दोन्ही देशांतील शिष्टमंडळांचा मिळून एक स्वतंत्र गट स्थापन करण्यात आला आहे. हा गट दोन्ही देशांच्या व्यापारी गरजा आणि आयात-निर्यातीचा आढावा घेऊन आपला एक अहवाल आपापल्या सरकारांना सादर करेल. आणि तिथून दोन्ही देशांचे मंत्रिगट चर्चा पुढे नेतील आणि निर्णय राबवले जातील असं उभय देशांमध्ये ठरलं आहे. अशी प्रतिनिधी स्तरावरील ही पहिली चर्चा होती.

(हेही वाचा – State Bank : रिलायन्सला मागे टाकत स्टेट बँक ठरली देशातील सगळ्यात नफा कमावणारी कंपनी)

भारत-व्हिएतनाम व्यापार

दक्षिण आशियाई देशांपैकी भारताची ११ टक्के निर्यात ही व्हिएतनामला होते. भारतातून व्हिएतनामला कृषि मालाबरोबरच मांस, प्राण्यांना लागणारा चारा, सागरी उत्पादनं आणि धान्यांचा पुरवठा होतो. शिवाय पोलाद आणि लोह निर्यातीतही व्हिएतनाम हा भारताचा एक मोठा व्यापारी मित्र आहे. तर व्हिएतनामचा या चर्चेदरम्यान भर होता तो भारतीय बाजारपेठ व्हिएतनामी उत्पादनांसाठी उपलब्ध व्हावी यावर. तिथून मालाची निर्यात सोपी व्हावी, दोन देशांमध्ये नियमित संवाद असावा असं व्हिएतनामच्या शिष्टमंडळाचं म्हणणं होतं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.