सोमालियाच्या किसमायू शहरात कार बॉम्बस्फोट आणि बंदुकीच्या गोळीबारात नऊ जण ठार झाल्यानंतर, शनिवारी दुपारी राजधानी मोगादिशूमध्ये दोन वेगवेगळ्या कारमध्ये स्फोट झाल्याचे समोर आले आहे. सोमालियाची राजधानी मोगादिशू येथे झालेल्या दोन बॉम्बस्फोटात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय किमान 300 लोक जखमी झाले आहेत. तर हा आकडा वाढला असल्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, सोमालियात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने तीव्र निषेध केला.
(हेही वाचा – शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात ‘हे’ ९ प्रकल्प महाराष्ट्रात, बघा यादी)
एका निवेदनाद्वारे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले, ” मोगादिशू येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा भारत तीव्र निषेध करतो ज्यामध्ये अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. आम्ही पीडितांच्या कुटुंबियांना मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि दुहेरी बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांना लवकरात लवकर बरे होण्याची कामना आहे. हा हल्ला आंतरराष्ट्रीय समुदायाला पुन्हा एकदा आठवण करून देतो की दहशतवादाचा त्याच्या सर्व स्वरूपातील आणि अभिव्यक्तींमध्ये मुकाबला करण्यासाठी एकजुटीने उभे राहण्याची आणि दृढनिश्चय करण्याची गरज आहे कारण तो आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी सर्वात गंभीर धोक्यांपैकी एक आहे. “
मिळालेल्या माहितीनुसार, सोमालियाची राजधानी मोगादिशू अध्यक्ष हसन शेख मोहम्मद यांनी रविवारी सकाळी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. या हल्ल्याचे वर्णन करताना त्यांनी क्रूर आणि भ्याड असल्याचे सांगत अल-शबाब गटाला दोषी ठरवले. विशेष म्हणजे यापूर्वी 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली होती. दरम्यान, अल-कायदाशी संबंधित अल-शबाब गटाने अनेकदा राजधानी मोगादिशूला लक्ष्य केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community