वळण किंवा उताराच्या बाजुला झुकणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस लवकरच सुस्साट धावणार!

104

भारतीय रेल्वेने सुपरफास्ट वेगामुळे निर्माण होणार्‍या भौतिकशास्त्रातील अडथळ्याना तोंड देण्यासाठी आपले पुढचे पाऊल देखील वळवले आहे. न्यूटोनियन नियम लक्षात घेऊन, देशात येत्या काही वर्षातच वळणावर किंवा उताराच्या बाजुला झुकणाऱ्या ट्रेन सुस्साट धावताना दिसणार आहे. परदेशात अशा ट्रेन असून ते तंत्रज्ञान भारतातील १०० वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आणण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

देशात येत्या २०२५ पर्यंत तब्बल ४०० वंदे भारत ट्रेन तयार केल्या जाणार आहे. यापैकी काही ट्रेन या अमेरिका, युरोपमधील देशात निर्यात केल्या जाणार आहेत. भारतातही आता परदेशांप्रमाणे उतार किंवा वळणावर झुकणाऱ्या ट्रेन धावताना दिसणार आहे. आणि याच तंत्रज्ञानाचा वापर करून १०० वंदे भारत ट्रेन तयार लवकरच केल्या जाणार आहे. याकरता एका कंपनीसोबत करार केला जाणार आहे.

(हेही वाचा – दौंड, कलबुर्गी येथे MSRTC बसला फासलं काळं, महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांची बस सेवा तात्पुरती बंद; काय आहे कारण?)

या ट्रेनला टिल्टिंग ट्रेन असेलही म्हटले जाते. या ट्रेन ब्रॉड गेज ट्रॅकवर वेगाने धावण्यासाठी सक्षम असताील. यामुळे वळणावर या गाड्यांचा वेग कमी करण्याची गरज लागणार नाही. या ट्रेन वेगासह वळणाचा अंदाज घेऊन एका बाजुला झुकतील आणि बॅलेन्स करतील. अशा प्रकारच्या ट्रेन सध्या ११ देशात धावत आहेत. सामान्य ट्रेनने वेगात वळण घेतल्यास ती रूळावरून घसण्याचा धोका अधिक असतो. हा धोका टाळण्यासाठी स्पेनिश निर्माता कंपनी टॅल्गोची मदत घेतली जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.