केंद्र सरकारने 2025 पर्यंत संपूर्ण देशातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कोरोना काळापासून रुग्णांना क्षयरोगाची औषधी उपलब्ध होत नाही आहे. अखेरीस हवालदिल झालेल्या एका रुग्णाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहून आपली दुःखद व्यथा मांडली. क्षयरोग्यापासून बचाव करणारी महत्त्वाची औषधे बाजारात उपलब्ध नसल्याची तक्रार रुग्णाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. औषधेच उपलब्ध नसतील तर देश क्षयरोग मुक्त कसा होईल, असा परखड सवालही रुग्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला.
जून पासून मुंबईसह राज्यभरात एमडीआर क्षयरोगग्रस्ताना आवश्यक औषधे बाजारात नाही आहेत. तीन महिन्यांपासून रुग्णांना औषध केंद्रातून मोफत औषधे उपलब्ध नाही आहेत. मुंबईसह राज्यातील 11हजार रुग्णांना याचा फटका बसला आहे. खाजगी मेडिकल स्टोअरमधून औषधे विकत घ्यावी लागत असल्याने मोठा आर्थिक भुर्दंड पडत असल्याची तक्रार रुग्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.
(हेही वाचा-Premature Birth : जन्मतः केवळ 800 ग्रॅम वजन!)
क्षयरोगग्रस्तांना आवश्यक असलेले सायक्लोस्करिन हे औषध राज्यभरात उपलब्ध नसल्याची कबुली राज्य आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. रुग्णांच्या दाव्यानुसार, उपचारासाठी आवश्यक असलेली पाचपैकी दोन औषधे गेल्या तीन महिन्यांपासून उपलब्ध होत नाहीयेत.
मुंबईतील क्षयरोगग्रस्त रुग्णांची आकडेवारी
वर्ष-नवे रुग्ण-झालेले रुग्ण- टक्केवारी
2019- 51 हजार 587 – 39 हजार 542 – 77
2020-37 हजार 943 – 29 हजार 068 – 77
2021-49 हजार 563 – 38 हजार 669 – 78
2022- 55 हजार 961 – 23 हजार 775 – 42
Join Our WhatsApp Community