भारत 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत एका वर्षासाठी जी20 देशांचे अध्यक्षपद स्वीकारणार आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली, डिसेंबर 2022 पासून देशभरात 200 हून अधिक जी-20 बैठका आयोजित करण्यात येण्याची शक्यता आहे. विविध राष्ट्र प्रमुखांच्या स्तरावर जी-20 नेत्यांची शिखर परिषद 9 आणि 10 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे.
( हेही वाचा : पुणेकरांनो आता हे अति झालं बरं का; पुणे, तिथे चप्पल तुटेपर्यंत नाचणे )
जी-20 किंवा ग्रुप ऑफ ट्वेंटी, हा जगातील प्रमुख विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचा एक आंतरशासकीय मंच आहे. यात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, यूके, यूएसए आणि युरोपियन युनियन एकत्रितपणे समावेश आहे. अध्यक्षपदाच्या काळात भारत, इंडोनेशिया आणि ब्राझील हे ट्रोइका तयार करतील. ही पहिलीच वेळ असेल जेव्हा ट्रोइकामध्ये तीन विकसनशील देश आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा समावेश असेल आणि त्यांना मोठा भाग मिळेल.
जी-20चा अध्यक्ष म्हणून भारत हा बांगलादेश, इजिप्त, मॉरिशस, नेदरलँड, नायजेरिया, ओमान, सिंगापूर, स्पेन आणि युएई या देशांना पाहुणे देश म्हणून आमंत्रित करणार आहे, तसेच आयएसए (इंटरनॅशनल सोलर अलायन्स), सीडीआरआय (आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी युती) आणि एबीडी (एशियन डेव्हलपमेंट बँक) यांना आमंत्रित करणार आहे.
Join Our WhatsApp Community