अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुन्हा एकदा क्रिप्टो चलनावर भाष्य केले आहे. क्रिप्टोच्या गैरवापराचा अंदाज घेत अर्थमंत्र्यांनी सांगितले की, देश या डिजिटल चलनाच्या नियमनाबाबत काळजीपूर्वक निर्णय लवकरच घेणार आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील एका कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले की, क्रिप्टोबाबत कोणताही घाईघाईने निर्णय घेतला जाणार नाही. तसेच भारत देश डिजिटल चलन सुरू करण्याच्या दिशेने वेगाने प्रगती करत आहे. 2030 पर्यंत डिजिटल चलन, रूपया सुरू करण्याचे भारताचे उद्दिष्ट असल्याचे मत अर्थमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा डिजिटल रूपया 2030 पर्यंत भारतात येण्याची शक्यता आहे.
… हे एक चांगले पाऊल
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 2022-23 मध्ये डिजिटल रुपया किंवा CBDC जारी करेल, अशी घोषणा सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केली होती. तर एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाबाबत सीतारामन म्हणाले की, हे एक चांगले पाऊल आहे. कारण पायाभूत सुविधांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारताला अनेक मोठ्या बँकांची गरज आहे.
(हेही वाचा – हे ‘भोगी’, आमच्या ‘योगीं’कडून शिका! अमृता फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा)
सर्व क्षेत्रांचे डिजिटलायझेशन करण्यावर सरकारचा भर
सर्व क्षेत्रांचे डिजिटलायझेशन करण्यावर सरकारचा भर आहे. त्यामुळेच सरकारने अर्थसंकल्पात डिजिटल चलन, डिजिटल बँका आणि डिजिटल विद्यापीठे निर्माण करण्याची घोषणा केल्याचे सीतारामन म्हणाल्या. पुढे अर्थमंत्री सीतारामन असेही म्हणाले की, सरकारचा हेतू केवळ डिजिटल चलनाद्वारे आर्थिक समावेशाची उद्दिष्टे पूर्ण करणे असा नाही तर, विविध व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करणे असा आहे. सरकार जन धन-आधार-मोबाइलच्या माध्यमातून आर्थिक समावेशाची उद्दिष्टे साध्य करत असून सरकार सर्व उद्योगांमध्ये डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे.