हिंदू बहुसंख्य असलेल्या भारतात अल्पसंख्याकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. अल्पसंख्याकांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी भारतीय संविधानात देखील महत्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. याचबाबत आता एका जागतिक अहवालात भारताचे कौतुक करण्यात आले असून, भारत हा अल्पसंख्याकांसाठी सर्वोत्तम देश असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
(हेही वाचाः आता ‘या’ कामांसाठी Birth Certificate अनिवार्य होणार, केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय)
भारताला अग्रस्थान
इतर कोणत्याही देशांपेक्षा भारत हा अल्पसंख्याकांसाठी सर्वोत्तम देस असून, भारतात अल्पसंख्याकांवर कोणतीही बंदने लादण्यात येत नाहीत, असे सेंटर फॉर पॉलिसी अॅनालिसीस या संशोधन संस्थेने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. या संस्थेकडून अनेक देशांतील धार्मिक अल्पसंख्याकांशी संबंधित एक अहवाल तयार केला असून, या अहवालात भारताला अग्रस्थान देण्यात आले आहे.
काय सांगतो अहवाल?
- अल्पसंख्याकांच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्कांच्या संवर्धनासाठी भारतीय राज्यघटनेत विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. अशा तरतुदी जगातील इतर कोणत्याही देशात नाहीत.
- भारत हा जगातील एकमेव असा देश आहे जिथे कोणत्याही धर्माच्या नागरिकांवर कोणतेही बंधन लादले जात नाही.
- भारताचे अल्पसंख्याकांसाठी असलेले हे धोरण संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे इतर देशांसाठी एक मॉडेल म्हणून वापरले जाऊ शकते.
- भारताचे हे मॉडेल विविधतेला प्रोत्साहन देणारे आहे.
(हेही वाचाः ‘आरे’ला ‘का रे’ नाहीच, मेट्रो कारशेडबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय)
Join Our WhatsApp Community