5G इंटरनेटमुळे विमान सुरक्षा धोक्यात? भारत-अमेरिका उड्डाणे रद्द, प्रवासी हवालदिल

108

१९ जानेवारीपासून अमेरिकेत तंत्रज्ञानसेवा सुरू झाली असून याचा गंभीर परिणाम विमानसेवेवर होणार आहे. 5G इंटरनेट तंत्रज्ञानामुळे विमान उड्डाणात तांत्रिक व्यत्यय येऊ शकतात, असे जागतिक पातळीवरील दहा आघाडीच्या एअरलाइन्सने स्पष्ट केले आहे. तसेच अमेरिकेतील अनेक विमानतळांवरील 5G इंटरनेटसेवेचा विस्तार करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे.

5G तंत्रज्ञानामुळे सध्या अनेक तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे विमान मार्ग बदलणे, रद्द करणे, विलंब होणे अशा समस्यांचा सामना करावा लागणार आहे, असे अमेरिकन एअरलाइन्सचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डेव्हिड सेमोर यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

ही उड्डाणे रद्द केली

याच पार्श्वभूमीवर बुधवारी, एअर इंडियाने भारत-अमेरिका मार्गावरील आठ उड्डाणे रद्द केली. एअर इंडियाने अधिकृत ट्विट करत प्रवाशांना ही माहिती दिली आहे. यामध्ये दिल्ली-न्यूयॉर्क, न्यूयॉर्क-दिल्ली, दिल्ली-शिकागो, शिकागो-दिल्ली, दिल्ली-सॅन फ्रान्सिस्को, सॅन फ्रान्सिस्को-दिल्ली, दिल्ली-नेवार्क आणि नेवार्क-दिल्ली यांचा समावेश आहे. अमेरिकेत 5G इंटरनेट सेवेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी एअरलाइन्सशी चर्चा करत आहे, असे भारतीय विमान वाहतूक नियामक डीजीसीएचे प्रमुख अरुण कुमार म्हणाले.

(हेही वाचा प्रतिकात्मक का होईना लोहगडावर उरुस झालाच! दुर्गप्रेमींना दिल्या नोटीस)

( हेही वाचा : सावधान! अशा वेबसाइट्स आणि यूट्यूब चॅनलवर सरकारची नजर )

धोका किती गंभीर आहे?

यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) ने दिलेल्या माहितीनुसार, 5G तंत्रज्ञान अल्टिमीटरसारख्या उपकरणांमध्ये हस्तक्षेप करू शकते. यामुळे विमान लँडिंगचा वेग कमी करणे कठीण होते, परिणामी विमान धावपट्टीपासून दूर जाते, अशी माहिती FAA ने दिलेली आहे. हे अल्टिमीटर (altimeters) विमान जमिनीपासून किती वर उडत आहे हे अंतर मोजतात तसेच विमानाच्या सुरक्षितता आणि नेव्हिगेशन सिस्टमसाठी डेटा प्रदान करतात. 5G मुळे याच अल्टिमीटर्सना धोका निर्माण होणार आहे.

( हेही वाचा : मुंबईकर वाघीण वीरा आणि आई करिश्माचे क्षण टिपताना… )

एअरलाइन्सने बिडेन प्रशासनाला पत्र लिहिले

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन एअरलाइन्सने बायडेन प्रशासनाला हे नवे तंत्रज्ञान काही काळ स्थगित करण्याची विनंती केली होती. या 5G तंत्रज्ञानाचा गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी पत्र लिहून दिला आहे. मात्र, एअरलाइन्सचा हा इशारा बायडेन प्रशासनाने किती गांभीर्याने घेतला आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही.

विमान कंपन्यांचे मत काय?

अनेक विमान कंपन्यांचे असेही म्हणणे आहे की विमानतळाभोवती 5G तंत्रज्ञानामुळे धोकादायक समस्या उद्भवू शकतात. हे पाहता 5G तंत्रज्ञान धावपट्टीपासून दोन मैलांच्या अंतरावर ठेवावे. काही एअरलाइन्सच्या सीईओंनी अमेरिकन परिवहन सचिवांना पत्र लिहून म्हटले आहे की, विमान वाहतूक उपकरणांमध्ये बदल न करता 5G कार्यान्वित केल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. 5G तंत्रज्ञानामुळे विमानाची उंची मोजण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.