जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेले ताजमहल पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडले आहे. आग्रामधील ताजमहलातील 22 बंद खोल्या उघडण्यात याव्यात आणि त्यांची भारतीय पुरातत्व खात्यामार्फत तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.
मंगळवारी सुनावणी
ताजमहलातील 22 खोल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. या खोल्यांमध्ये हिंदू मूर्ती आणि शिलालेख आहेत का? याची तपासणी करण्यासाठी त्या उघडण्यात याव्यात, असे भाजपचे अयोध्या जिल्ह्याचे माध्यम प्रभारी डाॅक्टर रजनीश सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
आधी याजागी शिवमंदीर होते
काही इतिहासतज्ज्ञ आणि हिंदू गटांनी ताजमहल म्हणजे मुळचे शिवमंदिर होते. असा दावा केला आहे. त्याबाबतचे तथ्य तपासण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणीही या याचिकेत केली आहे. या याचिकेत काही इतिहासकारांचे म्हणणेही नमूद कले आहे. ताजमहलाच्या चार मजली इमारतीच्या खालच्या भागात 22 खोल्या बंद करुन ठेवल्या आहेत. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, या खोल्यांमध्ये शिव मंदिराचे पुरावे आहेत. या खोल्या आधी कधी उघडण्यात आल्या होत्या त्याची माहिती नाही, असेही याचिकेत म्हटले आहे.
( हेही वाचा: ‘असानी’चे तीव्र चक्रीवादळात रुपांतर )
परमहंसाचार्य यांना ताज महालात जाण्यापासून रोखण्यात आले होते
याआधी काही दिवसांपूर्वी जगतगुरु परमहंसाचार्य यांना ताज महालात जाण्यापासून रोखण्यात आले होते. त्यांनीही तेथे शिवमंदिर असल्याचे म्हटले होते.
Join Our WhatsApp Community