खलिस्तान समर्थक हरदीपसिंह निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडा (India vs Canada) यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. निज्जरच्या हत्येत भारतीय गुप्तचर संघटनांचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी केल्यावर भारताने कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी केली. तेव्हापासून दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता कॅनडाने आपल्या नागरिकांसाठी नवीन अॅडव्हायजरी जारी करत वादात आणखी भर टाकली आहे.
कॅनडाने जारी केलेल्या नव्या ट्रॅव्हल अॅडव्हायजरीमध्ये म्हटले आहे की, सुरक्षिततेच्या कारणास्तव कॅनडाच्या (India vs Canada) नागरिकांनी जम्मू आणि काश्मीरचा प्रवास करू नये. या ठिकाणी दहशतवाद, अशांतता आणि अपहरणाचा धोका आहे. या यादीत केंद्रशासित प्रदेश लडाखचा समावेश नाही.
(हेही वाचा – ATS Karvai : दहशतवादी कारवाईला वेग ,मनमाड मध्ये एक संशयित ताब्यात)
जम्मू काश्मीर सोबत कॅनडाच्या (India vs Canada) नागरिकांना भारताच्या ईशान्येकडील राज्य आसाम, आणि मणिपूरमध्ये देखील न जाण्याचे आवाहन केले आहे. या सोबतच पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या पंजाब, राजस्थान आणि गुजरातचा समावेश असून पाकिस्तान सीमेपासून १० किमी भागात न जाण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.
“Avoid all travel to the Union Territory of Jammu and Kashmir due to the unpredictable security situation. There is a threat of terrorism, militancy, civil unrest and kidnapping. This advisory excludes travelling to or within the Union Territory of Ladakh,” says Canada in its… pic.twitter.com/AxV7aZ18q3
— ANI (@ANI) September 19, 2023
कॅनडाच्या या चिथावणीखोर वक्तव्यानंतर (India vs Canada) भारतानेही कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना खडे बोल सुनावले आहेत. कॅनडाकडून करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community