गेल्या काही दिवसांपासून भारत आणि कॅनडा (India vs Canada) यांच्यात वाद सुरु आहे. एका खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येनंतर या वादाला सुरुवात झाली. या सर्व पार्श्वभूमीवर मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता कॅनडाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा देणं अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आलं आहे. याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली, तरी कॅनडामध्ये व्हिसा केंद्रांचं संचालन करणाऱ्या बीएलएस इंटरनॅशनल वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे.
BSL इंटरनॅशनल वेबसाईटचा एक स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये “भारतीय व्हिसा (India vs Canada) सुविधा ही पुढील सूचना येईपर्यंत थांबवण्यात आली आहे” अशी सूचना दिली जात आहे. ही सूचना कॅनडातील इंडियन मिशनकडून दिली असल्याचंही या वेबसाईटवर सांगण्यात येत आहे.
Important notice from Indian Mission | “Due to operational reasons, with effect from 21 September 2023, Indian visa services have been suspended till further notice. Please keep checking BLS website for further updates,” India Visa Application Center Canada says. pic.twitter.com/hQz296ewKC
— ANI (@ANI) September 21, 2023
(हेही वाचा – India vs Canada : भारत तोडणाऱ्या खलिस्तानी गायकला विराट कोहलीने केले अनफॉलो)
खलिस्तानी दहशतवादी (India vs Canada) हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. भारताने हे आरोप फेटाळत; कॅनडा खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर्सना आश्रय देत असल्याचं म्हटलं होतं. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.
या वादामुळे दोन्ही देशांनी आपापल्या नागरिकांसाठी सूचना जारी केल्या होत्या. कॅनडामध्ये (India vs Canada) मोठ्या प्रमाणात भारतीय उपस्थित आहेत. तसंच भारतात देखील कॅनडातील बरेच पर्यटक आणि विद्यार्थी येत असतात. यामुळे दोन्ही देशांमधील तणावाचा फटका या विद्यार्थी, कर्मचारी आणि पर्यटकांना बसताना दिसत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community