धक्कादायक ! चीनने अरुणाचल प्रदेशातील बदलली 15 स्थळांची नावे

भारत आणि चीनमधील सीमावाद चिघळत चालला आहे. सीमेवर चीनकडून होणा-या कुरघोड्या वाढतच चालल्या आहेत. आता चीनने अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे आपल्या भाषेत ठेवली आहेत. अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलून हे तथ्य बदलणार नाही, असे उत्तर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आले आहे. अरुणाचल प्रदेशमधील 15 स्थळांची नावे चीन अक्षरे तिबत्ती आणि रोमण वर्णमालेत देण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यावर भारताकडून ही प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

नाव बदलण्याचा दुसरा प्रकार 

सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने  गुरुवारी दिलेल्या वृत्तानुसार चीनने जांगनान, अरुणाचल प्रदेशसाठी 15 स्थळांना चीनी अक्षरे, तिब्बती आणि रोमण वर्णमालेला मान्यदा दिली आहे. वृत्तानुसार चीनी मंत्रिमंडळ स्टेट काऊन्सिलद्वारे जारी नियमानुसार नावांमध्ये बदल करण्यात आला आहे. या 15 स्थानांमध्ये आठ रहिवासी ठिकाणे, चार डोंगर, दोन नद्या आणि एक दरीचा समावेश आहे. चीनकडून अरुणाचल प्रदेशातील स्थानांची नावे बदलण्यात आल्याचा हा दुसरा प्रकार आहे. यापूर्वी 2017 मध्ये चीनने 6 ठिकाणांची नावे बदलली होती.

( हेही वाचा: ऑनलाईन खरेदी करताय, मग जास्त पैसे मोजण्याची तयारी ठेवा! )

भारताचं सडेतोड उत्तर

अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिब्बत असल्याचा दावा चीन करतो. चीनचा हा दावा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तितक्याच जोमाने फेटाळून लावला आहे आणि  तो भारताचा अविभाज्य भाग असल्याचं चीनला ठासून सांगितलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here