Bengla SSC Scam: अर्पिता मुखर्जींच्या घरात पु्न्हा सापडले 29 करोड रुपयांचे घबाड; 5 किलो सोनेही जप्त

98

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती (West Bengal SSC Scam) घोटाळ्यामध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी सुरु आहे. अर्पिता मुखर्जी यांच्या कोलकात्यातील घरातून पुन्हा कोट्यवधी रुपयांचे घबाड जप्त करण्यात आले आहे. त्यांच्या घरातून ईडीने 29 कोटी रुपयांची रोकड आणि 5 किलो सोने जप्त केले आहे.

( हेही वाचा: आता अहमदनगरचेही नामांतर होणार ? ‘हे’ नाव देण्याची पडळकरांची फडणवीसांना विनंती )

पैसे मोजण्यासाठी अधिकारीही कमी पडले

अर्पिता मुखर्जी यांच्यावर ईडीची ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून तब्बल 21 कोटींची रोकड जप्त करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा 29 कोटींची रोकड आणि 5 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. हे पैसे मोजण्यासाठी नोटा मोजण्याचे मशीन मागवावे लागले. तसेच नोटांनी भरलेल्या बॅगा नेण्यासाठी ईडीला मोठा ट्रकदेखील बोलवावा लागला. पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई सुरु आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.