भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनेल; Bill Gates यांना विश्वास

Bill Gates on India : भारताच्या विकासाचा फायदा जगालाच होईल, असं त्याचं म्हणणं आहे

74
  • ऋजुता लुकतुके

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांच्या म्हणण्यानुसार, २०४७ पर्यंत भारत देश विकसित देश म्हणून नावारुपाला येऊ शकतो. इतकंच नाही तर भारतातील विकासाचा फायदा अख्ख्या जगालाच मिळेल, असंही त्यांना वाटतं. देशात विविध क्षेत्रांनी वेग पकडला असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

बिल गेट्स (Bill Gates) म्हणाले की, २०४७ पर्यंत देशाचा विकसित राष्ट्र म्हणून उदय झाल्यास केवळ भारतच बदलणार नाही तर जगावरही त्याचा सकारात्मक परिणाम होईल. ते म्हणाले, ‘भारतात आरोग्य आणि शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आल्याने एक अतिशय सकारात्मक गती निर्माण झाली आहे.’

भारताच्या आर्थिक विकासाचे भविष्य आशादायक असल्याचे सांगताना गेट्स म्हणाले, ‘विकास दर ५% असेल की १०% यावर वादविवाद सुरू असताना ही एक उत्तम परिस्थिती आहे. तथापि, मला वाटत नाही की ते १०% पर्यंत पोहोचेल, परंतु ते ५% च्या खालीही जाणार नाही.

(हेही वाचा Malegaon Blast प्रकरणात कर्नल प्रसाद पुरोहितांना सैन्य अधिकाऱ्यांनी गोवले; abinewz.com चा धक्कादायक खुलासा)

बिल गेट्स (Bill Gates) म्हणाले की आर्थिक विस्तारामुळे आरोग्यसेवा आणि शिक्षणात अधिक सरकारी गुंतवणूक शक्य होईल, ज्यामुळे महत्त्वपूर्ण संधी निर्माण होतील. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) बद्दल गेट्स म्हणाले की, या तंत्रज्ञानामुळे मोठे बदल घडून येतील. परंतु त्यांनी एआयमुळे नोकरी जाईल ही भीती फेटाळून लावली.

गेट्स यांनी भारताच्या एआय विकास दृष्टिकोनाचे कौतुकही केले. ते म्हणाले की, स्थानिक गरजांनुसार, भारतीय भाषांना पाठिंबा देण्यासह, भारताने ओपन-सोर्स फाउंडेशन मॉडेल स्वीकारले आहे हे चांगले आहे. बिल गेट्स (Bill Gates) यांनी आधार आणि यूपीआयसह भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचे कौतुक केले आणि ते जगासाठी देशाच्या सर्वात महत्त्वाच्या योगदानांपैकी एक असल्याचे म्हटले. गेट्स म्हणाले, ‘मी जेव्हा जेव्हा भारतात येतो तेव्हा मला अनेक कंपन्या या पायाभूत सुविधांचा फायदा घेताना दिसतात. मग ते बँकिंग असो, सरकारी फायदे असोत किंवा शेअर ट्रेडिंग असो. भारतीय तरुण देशाला पुढे घेऊन जाणार आहेत, असं ते म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.