कॅप्टन अभिनंदन यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते ‘वीर चक्र’ने सन्मान!

बालाकोट एअरस्ट्राईकनंतर 27 फेब्रुवारी 2019 रोजी हवाई हल्ल्यात पाकिस्तानी F-16 लढाऊ विमान पाडणारे ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानच्या F-16 या लढाऊ विमानाचा वेध घेत घुसखोरीचा प्रयत्न फोल ठरवला होता. त्यांच्या या यशस्वी कामगिरीमुळे त्यांचा वीर चक्राने सन्मान करण्यात आला. वीर चक्र हा तिसऱ्या क्रमांकाचा शौर्य पुरस्कार आहे. शत्रूला धूळ चारून त्याचा प्रयत्न अपयशी ठरवणाऱ्या या अभूतपूर्व शौर्यासाठी हा पुरस्कार प्रदान केला जातो.

नायब सुभेदार सोमबीर यांना जम्मू आणि काश्मीरमधील कारवाईदरम्यान A++ श्रेणीतील दहशतवाद्याला ठार केल्याबद्दल मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात येणार आहे. तसेच पाच दहशतवाद्यांचा खात्मा करणारे मेजर विभूती शंकर धौंडियाल यांनाही मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आला असून सन्मानित करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – धक्कादायक! आता भारतीय क्रिकेट संघासाठी ‘हलाल प्रमाणित’ आहार)

बालकोट एअर स्ट्राईकचा भारतातील ढाण्या वाघ अभिनंदन वर्धमान यांना नोव्हेंबर महिन्यातच प्रमोशन देण्यात आले आहे. विंग कमांडर असलेल्या अभिनंदन वर्धमान यांना ग्रृप कॅप्टनची रँक देण्यात आली आहे. एअर स्ट्राईकच्या वेळी पाकिस्तानच्या एफ 16 या फायटर विमानांना जसेच्या तसे उत्तर देणाऱ्या अभिनंदन यांना यापूर्वी शौर्य चक्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here