भारतीय हवाई दलाने यंदा ९१व्या वर्षात पदार्पण केले. जगातील सर्वाधिक शक्तिशाली हवाई दलांपैकी एक दल म्हणून ओळखले जाते. या वर्धापन दिनानिमित्त हवाई दलाला नवीन (Indian Air Force Day) ध्वज मिळाला आहे. यावेळी पार पडलेल्या संचलन कार्यक्रमात हवाई दल प्रमुख व्ही. आर. चौधरी यांनी नवीन ध्वजाचे अनावरण केले. ( Chief V. R. Chaudhary unveiled the new flag)
यावेळी पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यावेळी विमानांच्या चित्तथरारक कसरतींचे सादरीकरण करण्यात आले. तब्बल ७२ वर्षांनी बदल करण्यात आला. यानिमित्त आयोजित केलेल्या संचलनात प्रथमच महिलांच्या तुकडीने भाग घेतला. या तुकडीचे नेतृत्व ग्रुप कॅप्टन शालिजा धामी यांनी केले. हवाई दल प्रमुख चौधरी यांनी सलामी स्वीकारल्यानंतर त्यांच्या हस्ते ध्वजाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी हवाई दलाचा जुना ध्वज उतरवून सन्मानपूर्वक हवाई दल प्रमुखांना सुपूर्द करण्यात आला. आता हा ध्वज वायुसेना संग्रहालयात प्रदर्शित केला जाणार आहे.
(हेही वाचा – Balasore Train Accident : ‘त्या’ मृतदेहांवर होणार अंत्यसंस्कार)
नवीन ध्वजाचे वैशिष्ट्य
नव्या ध्वजावर उजव्या कोपऱ्यात भारतीय हवाई दलाचे बोधचिन्ह असून त्यामध्ये हिमालयीन गरुड आणि अशोक स्तंभाची भर पडली आहे. या नव्या रुपात भारतीय हवाई दलाचा ध्वज दिमाखात फडकला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हवाई दलाला शुभेच्छा दिल्या.