भारतीय वायुसेनेच्या ३ राफेल लढाऊ विमानांनी फ्रान्समधील बॅस्टिल डे परेडमध्ये चॅम्प्स एलिसीजवर, फ्रेंच लढाऊ विमानांसह फ्लायपास्ट केले. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या परेडमध्ये तिन्ही दलांच्या मार्चिंग युनिटचे २६९ जवान सहभागी झाले. सारे जहाँ से अच्छा या गाण्याने त्यांनी परेडला सुरुवात केली.
भारतीय लष्कराच्या पंजाब रेजिमेंटचे ७७ मार्चिंग स्क्वॉड आणि ३८ बँड पथकही सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभे राहून भारतीय लष्कराच्या तुकडीची सलामी स्वीकारली. त्याआधी एलिझाबेथ बॉर्न आणि फर्स्ट लेडी ब्रिजिट मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यानंतर राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी मोदींचे मिठी मारुन स्वागत केले.
रात्रीच्या जेवणात पंतप्रधान मोदींसाठी खास शाकाहारी मेनू तयार करण्यात आला आहे. नंतर मॅक्रॉन मोदींना कॉर मार्ले कोर्टयार्ड, द लूव्रे येथील संग्रहालयाचा दौरा देखील करवतील. यात जगातील सर्वात प्रसिद्ध आणि महागडे मोनालिसा पेंटिंग देखील आहे. संग्रहालयाचा दौरा केल्यानंतर मोदी आणि मॅक्रॉन आयफेल टॉवरच्या टेरेसवरून फटाक्यांच्या आतषबाजीचा आनंद घेणार आहेत.
(हेही वाचा – अर्थ खातं अजित पवारांकडेच, शिवसेनेकडील अत्यंत महत्त्वाचं खातंही राष्ट्रवादी काँग्रेसला)
फ्रान्स आणि भारत यांच्यातील “सामरिक भागीदारी” च्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त मोदींचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे धोरणात्मक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, शैक्षणिक आणि आर्थिक सहकार्यासाठी नवीन आणि महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित करण्यात येईल. भारत आणि फ्रान्स संयुक्त राष्ट्रांच्या उद्दिष्टांचे आणि तत्त्वांचे रक्षण करतात, जे इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील दोन राष्ट्रांमधील सहकार्याचा आधारस्तंभ म्हणून काम करतात आणि विशेषतः युरोप आणि इंडो-पॅसिफिकमध्ये शांतता आणि सुरक्षिततेसाठी एक दृष्टीकोन सामायिक करतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community