तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपामुळे गंभीरस्थिती निर्माण झाली आहे. तुर्कीच्या मदतीला भारतासह जगभरातील अनेक देश पुढे येत असताना पाकिस्तानने पुन्हा एकदा कुरघोड्या सुरू केल्या आहेत. भारताकडून मदतीसाठी जाणाऱ्या विमानांना पाकिस्तानने हवाई हद्दीत प्रवेश नाकारला आहे. यामुळे भारतीय विमानांना वळसा घालून तुर्कीमध्ये प्रवेश करावा लागत आहे.
( हेही वाचा : तुर्की- सिरियात हाहा:कार: 24 तासांत 40 हून अधिक भूकंपाचे धक्के; 4 हजारांहून अधिक बळी)
तुर्कीमध्ये आलेल्या भूकंपामुळे तेथील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिशय भयावह स्थिती निर्माण झाली असून जवळपास ४ हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाचे ४० हून अधिक धक्के बसले आहेत. हवामान बदलांमुळे बचावकार्यात सुद्धा अडथळे निर्माण होत आहेत.
भारताकडून मदतीचा हात
भारताने तुर्कीच्या मदतीसाठी NDRF जवानांची दोन पथके आणि आवश्यक उपकरणे पाठवली आहेत. जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय पथके सुद्धा तुर्कीला रवाना झाली आहेत. तुर्कीचे भारतातील राजदूत यांनी भारताचे आभार मानले आहेत. फिरात सुनेल यांनी संकटात मदतीला धावतो तोच खरा मित्र असे म्हणत भारताचे आभार मानले.
तुर्कीला मदत पाठवण्यासाठी बैठक झाली असून तुर्की सरकारच्या समन्वयाने भारतातून एनडीआरएफ, शोध आणि बचाव पथकांसह वैद्यकीय पथक तुर्कीसाठी रवाना झाल्याची माहिची पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.
Join Our WhatsApp Community