केदारनाथमधील हेलिकॉप्टर दुर्घटना ताजी असताना आता अरूणाचल प्रदेशात सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरूणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात तूतिंग भागात भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. भारतीय सैन्यातील ध्रुव हेलिकॉप्टर कोसळ्यानंतर बचाव कार्यासाठी पथक रवाना झाले. अद्याप या अपघातात जखमींबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
(हेही वाचा- BE/B.Tech आहात? बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी! मुलाखतीच्या आधारे होणार ‘या’ रिक्त पदांची भरती)
Itanagar, Arunachal Pradesh | A military chopper crashed near singging village, 25 kms away from the Tuting headquarters in the Upper Siang district today. Site of accident not connected by road, rescue team sent. Further details awaited: Defence PRO, Guwahati pic.twitter.com/G2y7aEjQmT
— ANI (@ANI) October 21, 2022
सियांग जिल्ह्यातील तूतिंग मुख्यालयापासून २५ किमी दूर अंतरावर असलेल्या सियांग गावात ही घटना घडली. भारतीय लष्करातील ध्रुव हेलिकॉप्टर कोसळलं असून या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तर अरूणाचलमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश होण्याची ही पहिली वेळ नाही. याच महिन्याच्या सुरूवातीलाही अरूणाचल प्रदेशातील तमांगजवळ भारतीय लष्टकराचं हेलिकॉप्टर कोसळले होते. या अपघातात चित्ता हेलिकॉप्टरमधील वैमानिक शहीद झाले होते. तर दुसरा वैमानिक जखमी झाले होते.
बघा व्हिडिओ
Received very disturbing news about Indian Army’s Advanced Light Helicopter crash in Upper Siang District in Arunachal Pradesh. My deepest prayers 🙏 pic.twitter.com/MNdxtI7ZRq
— Kiren Rijiju (@KirenRijiju) October 21, 2022