गेल्या काही दिवसांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये जवानांना अनेक दहशतवादी कारवायांचा सामना करावा लागत आहे. बुधवारी आणखी एक दहशतवादी कारवाई झाली. जम्मू- काश्मीर पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत लष्कर- ए- तोयबाच्या कमांडरचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईदरम्यान, एक पोलीसही जखमी झाल्याची माहिती आहे.
J&K | A rifle, pistol along with several magazines & grenades were recovered from the dropped packet opened by the bomb disposal squad in Jammu's Arnia: J&K Police https://t.co/W8tp93AfmP pic.twitter.com/6DHSd8QJu6
— ANI (@ANI) August 17, 2022
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये टोफ गावात आंतरराष्ट्रीय सीमेजवळील अर्निया सेक्टरमधील तुरुंगातून कार्यरत असलेल्या लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद अली हुसैन हा चकमकीत ठार झाला आहे. मोहम्मद अली हुसेन याला शस्त्र जप्तीसाठी घटनास्थळी नेले जात होते. त्याचवेळी ही चकमक झाली.
( हेही वाचा: खड्ड्यांमुळे मुंबई पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा )
लष्कर-ए -तोयबाचा कमांडर ठार
लष्कर-ए -तोयबाचा दहशतवादी कमांडर मोहम्मद अली हुसैन याने पोलीस दलावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी झाडलेल्या गोळीमुळे तो जखमी झाला. यानंतर रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला.
Join Our WhatsApp Community