पाण्यावर चालणे, एका हाताने पुशअप आणि बरेच काही…आहे तरी कोण हा तरूण? वाचा…

तो चक्क पाण्यावर चालतो, लांब उड्या मारतो, बांबूवर वाकडा उभा राहतो, इतकेच काय तर जिममधील सर्व प्रकार अगदी सहजपणे करणारा हा तरुण इन्स्टाग्राम रिल्सवर व्हायरल होत आहे. आजवर आपण केवळ चित्रपटातील अभिनेत्यांना विविध स्टंट करताना पाहिले आहे. परंतु या तरुणाचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत जात आहे. आपल्या भारतासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, कारण हा तरुण भारतीय लष्करात कार्यरत असून याचे नाव अनमोल चौधरी असे आहे.

( हेही वाचा : लग्नानंतर तब्बल 11 वर्षे पत्नी सासरी गेलीच नाही! न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय )

दिग्गजांकडून कौतुकाची थाप

अनमोल चौधरी हा भारतीय सैन्यातील एक सैनिक असून त्याचे दैनंदिन व्हिडिओ तो इंस्टाग्रामवर शेअर करत असतो. या सर्व व्हिडिओमध्ये तो धाडसी स्टंट करताना दिसत आहे. अनमोल चौधरीचे व्हिडिओ आता व्हायरल झाले आहेत कारण, अॅक्शन हिरो विद्युत जामवालने या ट्रेडिंग व्हिडिओची क्लिप त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. आणि अभिनता हृतिक रोशननेही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. विद्युत जामवाल हा जगातील टॉप सहा मार्शल आर्ट कलाकारांपैकी एक आहे याने स्वत: अनमोल याचा व्हिडिओ शेअर करत या भारतीय जवानाचे कौतुक केले आहे.

थरारक स्टंट

या विविध व्हिडिओमध्ये, तो एका लाकडी बांबूवर स्वत:ला बॅलन्स (BALANCE) करताना दिसतो. दुसऱ्या एका स्टंटमध्ये तो काचेच्या तीन बाटल्यांवर दोन्ही पाय आणि एका हाताने पुशअप करताना दिसत आहे. आणि सर्वात थरारक स्टंट म्हणजे अनमोल चार बादल्यांमधील पाण्यावरून चालताना दिसत आहे. तर अनमोल त्याच्या इतर काही व्हिडीओजमध्‍ये पुशअप करत आहे आणि त्‍याच्‍या पाठीवर इतर तीन सैनिक उभे आहेत. त्याने जिममधील विविध स्टंट सुद्धा रिल्यमध्ये शेअर केले आहेत. अनमोलचे हे स्टंट खरोखरच आश्चर्यकारक आहेत. अनेक दिग्गजांनी कमेंट करत, अनमोल यांचे कौतुक केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here