‘भारत माता की जय’ म्हणत, भारतीय जवानांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा!

78

“आम्ही सुरक्षित आहोत कारण आमचे सैनिक देशाच्या सीमेवर आमचे रक्षण करत आहेत!” त्यांचे शौर्य, देशभक्ती आणि बलिदान आठवले की खर्‍या देशभक्ताची छाती अभिमानाने उंचावते. देशाच्या सीमेवर अनेक आव्हाने असतानाही भारतीय जवान निराशेचा एक क्षणही आपल्या मनात येऊ देत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की, यामुळे देशाच्या 130 कोटी जनतेचे मनोधैर्य खचून जाईल आणि देशाची सुरक्षा धोक्यात येईल. आम्ही तुमच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर आहोत असे सांगत भारतीय आपल्या जवानांनी समस्त देशवासीयांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या वीर जवानांनी केलेल्या अनोख्या नववर्ष स्वागताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

( हेही वाचा : नवीन शैक्षणिक वर्षात दहावीच्या मुलांना मिळणार नवीन टॅब )

नवीन वर्षाच्या शुभेच्छा

जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळून भारतीय लष्कराच्या जवानांनी देशवासीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय लष्कराचे काही वीर जवान आपल्या रायफल्ससह बर्फाने आच्छादलेल्या पर्वतावरून चालत येत आहेत. त्यांच्या हातात तिरंगा ध्वज आहे. एक जवान आपल्या हातातील तिरंगा मोठ्या ऐटीत तेथील जमिनीत रोवतो. त्यानंतर एक जवान भारतीयांना नववर्षाच्या शुभेच्छा देताना म्हणतो की, ‘इंडीयन आर्मीकडून समस्त देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा…’ हा व्हिडिओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.