Indian Coast Guard Day 2024 : देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी तत्पर असलेले भारतीय तटरक्षक दल

407
Indian Coast Guard Day 2024 : देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी तत्पर असलेले भारतीय तटरक्षक दल
Indian Coast Guard Day 2024 : देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी तत्पर असलेले भारतीय तटरक्षक दल

दरवर्षी १ फेब्रुवारी या दिवशी देशभरात भारतीय तटरक्षक दिन (Indian Coast Guard Day) साजरा केला जातो. या महत्त्वाच्या दिवशी भारतीय तटरक्षक दलातील सैनिकांना आपल्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी सन्मानित केले जाते तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन केले जाते. जसे की, प्रदर्शन, परेड आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय तटरक्षक दिनविशेषाची माहिती असायलाच हवी. कारण स्पर्धा परीक्षांमध्ये या विषयांतील प्रश्न हमखास विचारले जातात. (Indian Coast Guard Day 2024)

(हेही वाचा – Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करतील)

७५०० किलोमीटर सागरी सीमेचे संरक्षण

आपल्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी कायम तत्पर असणाऱ्या जवानांना हा दिवस समर्पित केलेला असतो. भारतीय तटरक्षक दल हे एक सशस्त्र सैनिक दल असून या दलातील सैनिक आपल्या जवळपास ७५०० किलोमीटर असणाऱ्या सागरी सीमेचे (Maritime boundaries) संरक्षण करतात. एवढेच नव्हे तर हे सैनिक समुद्रातून होणारी तस्करी थांबवणे, डाकुंपासून संरक्षण आणि इतर नैसर्गिक संकटांपासून संरक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असतात. तसेच तटरक्षक दल हे भारतीय नौसेना, मत्स्य विभाग आणि केंद्रीय तसेच राज्यातील पोलीस दलांसमावेत आपले काम करतात.

भारतीय तटरक्षक दलाची जहाजे ही नौसेनेच्या जहाजांपेक्षा वेगळी असतात. या दलाचे सैनिक आपल्या क्षेत्रातील मासेमाऱ्यांचे रक्षण करतात. तसेच इतर परदेशी मासेमाऱ्यांपासून आपल्या सीमेचे रक्षण करणे हेही त्यांचे कर्तव्य असते. याप्रमाणेच आपल्या सागरी सीमांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अवैध हालचाली होणार नाहीत याचेही लक्ष त्यांना ठेवावे लागते. एवढेच नाही तर भारतीय तटरक्षक दलातील सैनिक सागरी जीवन आणि सागरी संपत्तीच्या सुरक्षिततेसाठी लागणारा वैज्ञानिक डेटा एकत्र करण्यासही मदत करतात.

(हेही वाचा – Exam Paper Leaks : पेपरफुटीच्या विरोधात सरकार कठोर; उचलणार ‘हे’ पाऊल)

१५० पेक्षा जास्त जहाज आणि १०० पेक्षा जास्त विमाने

भारतीय तटरक्षक सशस्त्र सैनिक दलाकडे (Armed Forces) जवळपास १५० पेक्षा जास्त जहाज आणि १०० पेक्षा जास्त विमाने आहेत, ज्यामध्ये विभिन्न प्रकारच्या आपत्तींचा सामना करण्यासाठी भरपूर क्षमता आहे. सागरी सीमांचे संरक्षण करण्यासाठी १ फेब्रुवारी १९७७ साली इंडियन कोस्ट गार्डची स्थापना केली गेली होती. तेव्हापासून दरवर्षी भारतीय तटरक्षक दिवस साजरा केला जातो.

भारतीय तटरक्षक दलाची स्थापना झाली त्यावेळी या दलाकडे केवळ २ जहाज आणि ५ गस्त घालणाऱ्या नौका होत्या. त्यावेळी या दलाचे पहिले महानिर्देशक ऍडमिरल व्ही. ए. कामथ हे होते. वर्तमानकाळात राकेश पाल हे भारतीय तटरक्षक दलाचे २५ वे महानिर्देशक आहेत. यावर्षी इंडियन कोस्ट गार्डला (Indian Coast Guard) ४८ वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणजेच यावर्षी ४८ वा भारतीय तटरक्षक दिवस साजरा केला जाणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.