व्हिएतनामहून दिल्लीत आलेल्या दांम्पत्याकडे सापडली 45 पिस्तुले

146

नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा अधिकाऱ्यांनी 45 पिस्तुले जप्त केली आहेत. याप्रकरणी व्हिएतनामहून आलेल्या एक भारतीय दाम्पत्याला अटक करण्यात आल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे यापूर्वी टर्कीहून 25 पिस्तुलांची तस्करी केल्याचे कबुली या दाम्पत्याने दिली आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार तस्करीत सहभागी असलेले हे जोडपे व्हिएतनामहून दिल्ली विमानतळावर उतरले होते. जगजित सिंग आणि जसविंदर कौर अशी त्यांची नावे असून हे पती-पत्नी आहेत. त्यांच्याकडे असलेल्या ट्रॉली बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात पिस्तुले भरलेली होती. त्यामुळेहे दोघेही विमानतळाबाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते तसेच त्यांची हालचालही संशयास्पद वाटल्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडील ट्रॉली बॅग तपासली. त्यावेळी यामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्र असल्याची बाब निदर्शनास आली.

(हेही वाचा – पवारांनी मुंबई मनपा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले! म्हणाले “कुणी सोबत…”)

एवढ्या मोठ्या प्रमाणात पिस्तुले बॅगेत भरलेली पाहून विमानतळावरील अधिकारीही काही काळ चक्रावून गेले. करण्यात आलेल्या या कारवाईनंतर संबंधित जोडप्याकडील बॅग जप्त करण्यात आली असून, ही शस्त्रे कोणाकडे पोहोचवण्यात येणार होती याचा तपास केला जात आहे. हे प्रकरण आता एनएसजीकडे हस्तांतरित करण्यात आल्याचे विमानतळ कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.