किरण शंकर मोरे (Kiran More) यांचा जन्म ४ सप्टेंबर १९६२ साली झाला. ते एक माजी क्रिकेटपटू आणि १९८४ ते १९९३ या सालांदरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे यष्टिरक्षक होते. त्यावेळेस दिलीप वेंगसरकर यांची निवड होण्याआधी त्यांनी बी.सी.सी.आय.च्या सिलेक्शन कमिटीचं अध्यक्षपदही सांभाळलं. जुलै २०१९ साली युनायटेड स्टेट्स राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी वरिष्ठ सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
१९८८ सालच्या आशिया कप आणि १९९०-९१ सालच्या आशिया कप भारतीय संघाने जिंकला होता. किरण मोरे हे त्यावेळी भारतीय संघातून क्रिकेट खेळले होते. किरण मोरे (Kiran More) १९७० सालच्या दशकाच्या उत्तरार्धात भारताच्या क्रिकेट संघासाठी अंडर-१९ मधून खेळले होते. तसंच ते मुंबईतल्या टाइम्स शिल्डमध्ये टाटा स्पोर्ट्स क्लबसाठी आणि १९८२ साली नॉर्थ लँकेशायर लीगमध्ये बॅरोसाठीही खेळले होते. त्यांनी १९८२-८३ साली वेस्ट इंडिजचा दौरा एकही कसोटी सामना न खेळता फक्त सय्यद किरमानी यांच्यासाठी केला होता.
(हेही वाचा – BMC : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची तारीख सरकते पुढे, मागील अनेक महिन्यांपासून एक तारखेचा मुहूर्तच चुकतो)
किरण मोरे (Kiran More) यांनी १९८३-८४ साली रणजी ट्रॉफी सामन्यांत बडोदा संघातून महाराष्ट्राविरुद्ध 153* आणि उत्तर प्रदेशविरुद्ध 181* धावा केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी वासुदेव पटेल यांच्यासोबत शेवटची विकेट वाचवण्यासाठी १४५ धावा केल्या. त्यांच्या या धावा पुढच्या दशकभर रणजीमधला एक विक्रम बनून राहिल्या होत्या. १९८४-८५ सालामध्ये इंग्लंडविरुद्धच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये किरण मोरे हे तुफान खेळताना दिसले.
१९८६ सालची किरण मोरे यांची इंग्लंडविरुद्ध खेळलेली पहिली कसोटी मालिका, ही त्यांच्या करकीर्दीतली सर्वात यशस्वी मालिका ठरली. या मालिकेत त्यांनी तीन कसोटींमध्ये यष्टीरक्षक म्हणून १६ झेल झेलले. हा एक विक्रम ठरला. तसंच फलंदाजीच्या सरासरीमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर होते. किरण मोरे हे नेहमीच्या फलंदाज अपयशी ठरल्यावर महत्त्वाची खेळी खेळत असत.
(हेही वाचा – ST Bus Strike : एसटीचा संप सुरूच; बैठकीतील आवाहनांना प्रतिसाद नाही)
१९८८-८८ साली किरण मोरे (Kiran More) यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध बार्बाडोस येथे ५० धावा केल्या. तसंच कराची येथे पाकिस्तान विरुद्ध भारताने पहिले सहा विकेट ६३ आणि ५८ धावांमध्ये गमावले तेव्हा किरण मोरे यांनी आपल्या कारकिर्दीतली सर्वोत्तम खेळी खेळून पराक्रम केला. याव्यतिरिक्त १९८८-८९ सालामध्ये मद्रास येथे वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने सहा फलंदाजांना यष्टीचित केलं. त्यांपैकी पाच तर दुसऱ्याच डावात यष्टीचित झाले होते. त्यांची ही खेळी कसोटी सामन्यांमध्ये रेकॉर्ड बनून राहिली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community