Indian Currency: नोटांवर का असतात ‘या’ तिरक्या रेषा? तुम्हाला माहितीये का? वाचा…

162

आपल्या सगळ्यांची इच्छा असते की एक न एक दिवस आपल्याकडे भरपूर पैसा असावा. आपण श्रीमंत व्हावं, यासाठी लोकं आयुष्यभर कष्ट, मेहनत करून पैसे कमवतात. पण तुम्ही कधी या नोटांचे जवळून निरीक्षण केले आहे का? जर तुम्ही कधी भारतीय नोट पाहिली असेल, तर तुम्हाला नोटावर बाजूला तिरकस रेषा दिसतील. पण तुम्हाला माहीत आहे का, या तिरकस रेषा नोटेवर का दिल्या जातात?

(हेही वाचा – Indian Currency: कागदाशिवाय तयार होतात भारतीय नोटा, या मटेरियलचा होतो वापर!)

आपल्यापैकी काही जणांना असेही वाटले असेल की, या रेषा नोटांची छपाई होत असताना चुकून छापल्या गेल्या असावेत. पण तुम्हालाही असे वाटत असेल, तर हे चुकीचे आहे. नोटांवरील या तिरकस रेषा त्या ठराविक नोटेबद्दल खूप काही सांगून जातात. म्हणून, या तिरकस रेषा 100 रूपयांपासून ते 2000 रूपयांच्या सर्व नोटांवर छापलेल्या दिसतात.

note 1

…म्हणून सर्व नोटांवर या तिरकस रेषा असतात

जर तुम्ही या सर्व भारतीय नोटा काळजीपूर्वक पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की, नोटेच्या किंमतीनुसार या तिरकस रेषांची संख्या देखील वाढते. या तिरकस रेषांना ‘ब्लीड मार्क्स’ असे म्हणतात. हे ब्लीड मार्क्स खास अंध, दिव्यांग व्यक्तींसाठी बनवलेले आहेत. ज्यांना दिसत नाही, त्यांच्या हातात किती रुपयांची नोट आहे, हे त्यांना या नोटेला स्पर्श करून सहज कळू शकते. दरम्यान, या वेगवेगळ्या नोटांवर त्यांच्या किंमत, मुल्यानुसार वेगवेगळ्या तिरकस रेषा दिलेल्या दिसतात आणि याच कमी-जास्त रेषांमुळे अंध व्यक्तींना ती नोट किती रूपयांची आहे हे समजते.

(हेही वाचा – RBI New Rule: तुमच्याकडे ‘या’ नोटा आहेत का? असतील तर त्यांची किंमत ‘शून्य’!)

नोटांवर छापलेल्या रेषा त्यांची किंमत सांगतात

भारतीय रिझर्व्ह बँक या सर्व नोटांवर अंध व्यक्तींच्या सोयीसाठी या तिरकस रेषा बनवते. 100 रुपयांच्या नोटेच्या दोन्ही बाजूला 4-4 रेषा दिलेल्या दिसतात, ज्याला स्पर्श केल्यावर अंध व्यक्तींना समजते की ही 100 रुपयांची नोट आहे. त्याचप्रमाणे, 200 च्या नोटेवर देखील 4-4 रेषा आणि त्याच्यामध्ये दोन लहान गोल आकार दिलेले दिसतात. 500 रुपयांच्या नोटेबद्दल सांगायचे झाले तर त्यावर एकूण 5 रेषा आहेत. याशिवाय 2000 च्या नोटेच्या दोन्ही बाजूला 7-7 तिरकस रेषा छापल्या आहेत. या रेषांच्या मदतीने अंध व्यक्ती ही नोट खरी आहे की खोटी हे देखील ओळखू शकतात.

New Project 19 1

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.