लक्ष्मी मित्तल (Lakshmi Mittal) हे भारतीय उद्योगपती आहेत. जगातली दुसरी सर्वात मोठी पोलादाचं उत्पादन करणारी कंपनी आहे. तसेच त्यांची कंपनी स्टेनलेस स्टील उत्पादनही करते. (Lakshmi Mittal)
२००५ साली फॉर्ब्सने जाहीर केलेल्या जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीनुसार लक्ष्मी मित्तल हे तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यामुळे जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या वार्षिक यादीमध्ये पहिल्या दहा व्यक्तींमध्ये स्थान मिळविणारे लक्ष्मी मित्तल (Lakshmi Mittal) हे पहिले भारतीय नागरिक ठरले. (Lakshmi Mittal)
(हेही वाचा- Rain Update: मुंबई, पुण्यासह कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस? हवामान खात्याचा अंदाज जाणून घ्या)
त्यानंतर २०११ साली फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये लक्ष्मी मित्तल (Lakshmi Mittal) हे सहाव्या क्रमांकावर होते. त्यानंतर मार्च २०१५ साली ते ८२व्या स्थानावर आले. २००५ साली लक्ष्मी मित्तल यांनी आपली मुलगी वनीषा मित्तल हिचं धुमधडाक्यात लग्न लावलं होतं. हे लग्न जगातल्या सर्वांत महागड्या लग्नांपैकी दुसऱ्या क्रमांकाचं भव्य सोहळा असणारं लग्न होतं. (Lakshmi Mittal)
लक्ष्मी मित्तल (Lakshmi Mittal) हे २००८ सालापासून गोल्डमन सॅक्सच्या संचालक मंडळाचे सदस्य आहेत. तसेच ते वर्ल्ड स्टील असोसिएशनच्या कार्यकारी समितीचे सदस्यही आहेत. याव्यतिरिक्त ते चायनीज पीपल्स असोसिएशन फॉर फ्रेंडशिप विथ फॉरेन कंट्रीज, कझाकीस्तान येथील परकीय गुंतवणूक परिषद, जागतिक आर्थिक मंचाच्या ग्लोबल सीईओ काऊन्सिलचे सदस्यही आहे. तसेच इंटरनॅशनल बिझनेस काऊन्सिल आणि उद्योगपतींचे युरोपियन गोलमेज परिषदेचे काऊन्सिलर आहेत. याव्यतिरिक्त लक्ष्मी मित्तल हे क्लीव्हलँड क्लिनिकच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य देखील आहेत. (Lakshmi Mittal)
(हेही वाचा- Sikkim Flood : सिक्कीममध्ये पावसाचा हाहाकार! हजारो पर्यटक अडकले, 6 जणांचा मृत्यू)
२००५ साली ‘द संडे टाईम्स’ नावाच्या मॅगझीनने लक्ष्मी मित्तल यांना ‘बिझनेस पर्सन ऑफ २००६’ असं म्हटलं आहे. तर ‘द फायनान्शियल टाईम्सने’ ‘द पर्सन ऑफ द इयर’, तर टाईम्स मॅगझीनने ‘इंटरनॅशनल न्यूजमेकर ऑफ द इयर २००६’ असं म्हटलं आहे. २००७ साली टाईम्स मॅगझीनने त्यांना त्यांच्या ‘टाईम्स १००’च्या यादीमध्येही स्थान दिलं होतं. (Lakshmi Mittal)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community