हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यात आलेल्या केंद्रीय परराष्ट्र खात्याच्या वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. परराष्ट्र खात्याचा हा वाहन चालक गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवत होता. त्याला दिल्लीतील जवाहरलाल नेहरू भवन येथून अटक करण्यात आली आहे.
ISAI ने हनीट्रॅपमध्ये अडकवले
आरोपीला पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISAI ने हनी ट्रॅपमध्ये अडकवले होते. त्यामुळे तो भारताची गोपनीय आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवत होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून इतर माहिती गोळा केली जात आहे. यासोबतच त्याने पाकिस्तानला कोणती माहिती दिली आहे, हेही जाणून घेण्याचा प्रयत्न सुरक्षा यंत्रणा करत आहेत.
गुप्तचर विभागाने केली अटक
गोपनीय माहिती पाकिस्तानी व्यक्तीला पाठवताना त्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. या बदल्यात वाहन चालकाला पैसे देण्यात येणार होते. हनी ट्रॅपद्वारे महत्त्वाच्या विभागातील लोकांना अडकवून त्यांच्याकडून हेरगिरीची कामे करून घेतली जातात. याआधी सुद्धा भारतातून अशा काही प्रकरणांमध्ये काही लोकांना अटक करण्यात आली होती.
पूनम शर्मा किंवा पूजा अशा नावाने पाकिस्तानी व्यक्तीने परराष्ट्रा खात्यातील वाहनचालकासोबत मैत्री केली त्यानंतर पैशाच्या आमिषाने हेरगिरी करण्यास सुरूवात केली. याबाबत माहिती मिळताच भारतीय गुप्तचर यंत्रणांनी त्याच्यावर लक्ष ठेवले, आणि गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवत असताना त्याला रंगेहाथ पकडले. या अटक केलेल्या वाहनचालकाचे नाव अद्याप गुप्तचर विभाकडून जाहीर करण्यात आलेले नाही.
Join Our WhatsApp Community