कोंजीवरम श्रीरंगचारी शेषाद्री (C. S. Seshadri) हे भारतीय गणितज्ञ होते. ते चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक आणि संचालक होते आणि बीजगणितीय भूमितीमधील त्यांचे कार्य खूप मोठे आहे. नरसिंहन-शेषाद्री प्रमेयासाठी त्यांनी गणितज्ञ. एम. एस. नरसिंहन यांच्याशी हातमिळवणी केली होती. हे प्रमेय खूपच प्रसिद्ध झाले होते. (C. S. Seshadri)
जगभरात गौरव
गणितज्ञ म्हणून सी. एस. शेषाद्री (C. S. Seshadri) यांचा गौरव जगभरात झाला. त्यांना पद्मभूषण, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार, रॉयल सोसायटी फेलोशिप आणि अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या फेलोशिप असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर, पंतप्रधान, राष्ट्रपती आणि अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. (C. S. Seshadri)
चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटची स्थापना
त्यांनी चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली, जी गणित, संगणकीय विज्ञान आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्रावरील अभ्यासक्रमांसह जगभरातील प्रतिभावंत लोकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बीजगणितीय भूमितीमधील त्यांचे यशस्वी संशोधन; त्यांच्या नावावर एक प्रमेय आणि स्थिरांकाचा प्रकार आहे. (C. S. Seshadri)
(हेही वाचा – BCCI Central Contracts : श्रेयस, इशानला अपेक्षेप्रमाणे बीसीसीआयचं करारपत्र नाही)
इंडियन ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो
या महान गणितज्ञाचा जन्म तमिळनाडूमधील कांचीपुरम येथे एका हिंदू ब्राह्मण कुटुंबात २९ फेब्रुवारी १९३२ रोजी झाला. त्यांनी १९५३ मध्ये मद्रास विद्यापीठातून गणितात बी. ए. (ऑनर्स) पदवी मिळवली. त्यांनी के. एस. चंद्रशेखरन यांच्या मार्गदर्शनाखाली १९५८ मध्ये बॉम्बे विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली. १९७१ मध्ये त्यांची इंडियन ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो म्हणून निवड झाली. (C. S. Seshadri)
यशस्वी कारकीर्द
शेषाद्री यांनी १९५३ ते १९८४ या काळात मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च येथे गणिताच्या शाळेत काम केले. त्यांनी इथे रिसर्च स्कॉलर म्हणून सुरुवात केली आणि पुढे जाऊन ते वरिष्ठ प्राध्यापक बनले. १९८४ ते १९८९ दरम्यान त्यांनी चेन्नईच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसमध्ये काम केले. १९८९ ते २०१० दरम्यान त्यांनी चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक संचालक म्हणून काम केले. पायउतार झाल्यानंतर अखेरपर्यंत ते संस्थेचे संचालक म्हणून काम करत राहिले. २०१० आणि २०११ मध्ये त्यांनी इन्फोसिस पुरस्कारासाठी गणित विज्ञान ज्युरी म्हणूनही काम केले होते. १७ जुलै २०२० मध्ये त्यांचे निधन झाले. (C. S. Seshadri)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community