Indian Navy day : इंडियन नेव्ही डे

337
Indian Navy day : इंडियन नेव्ही डे
Indian Navy day : इंडियन नेव्ही डे

भारतीय नौदल (Indian Navy day) ही भारताची ताकद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही ताकद ओळखली आणि त्यांनी नौदल बळकट केले. कान्होजी आंग्रे यांचे नौदलामध्ये मोठे योगदान आहे. शिवरायांना समुद्र मार्गाचे महत्व ठाऊक होते. शत्रू समुद्रमार्गातून येतो, त्यामुळे शत्रूला रोखण्यासाठी समुद्रमार्ग सुरक्षित असायला हवा.

स्वा. सावरकरांनी सुद्धा नौदलाचे महत्व सांगितले आहे. अंदमानला शिक्षा भोगायला जाताना त्यांच्या मनात पहिला विचार आला की अंदमान येथील नौदल मजबूत केले की शत्रूला इथेच रोखता येईल. नौदलाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी हा इंडियन नेव्ही डे (Indian Navy day) म्हणजेच भारतीय नौदल दिन साजरा केला जातो.

(हेही वाचा-IND vs AUS 5th T20 : भारताने ४ – १ ने मालिका जिंकली)

१९७१ च्या भारत पाक युद्धात भारती नौदलाने विजय प्राप्त केला होता. ३ डिसेंबर रोजी पाकिस्तानी सैन्याने भारतीय हवाई क्षेत्राच्या आणि सीमावर्ती भागात हल्ला केला. यानंतरच १९७१ चे युद्ध घडले. पाकिस्तानच्या नौदलाच्या मुख्यालयाला लक्ष्य करण्यासाठी ट्रायडन्ट हे ऑपरेशन सुरु करण्यात आले.

या अंतर्गत पाकिस्तानच्या कराची नौदल तळावर हल्ला केला गेला आणि यश प्राप्त केले. या यशाच्या निमित्ताने दरवर्षी ४ डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन म्हणजेच इंडियन नेव्ही डे साजरा केला जातो.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.