भारतीय वंशांचे अजय बंगा (Ajay Banga) यांची जागतिक बँकेचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असून येत्या २ जून पासून ते पदभार स्वीकारतील. पुढच्या पाच वर्षांसाठी ते अध्यक्षपदावर असणार आहेत. जागतिक बँकेच्या २५ सदस्यीय कार्यकारी मंडळाने बुधवार ३ मे रोजी अजय बंगा यांची अध्यक्ष म्हणून निवड केली आहे.
(हेही वाचा – The Kerala story : सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप करण्यास नकार; बंदीची मागणी फेटाळली)
बायडेन यांनी केले होते नॉमिनेट
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी बंगा (Ajay Banga) यांच्या नावाची नियुक्ती केली होती. अजय बंगा यांचे जालंधर आणि शिमलामधून शिक्षण झाले असून त्यांनी DU मधून पदवी आणि IIM अहमदाबादमधू MBA केले आहे. भारत सरकारने त्यांना २०१६ मध्ये पद्मश्री या मानाच्या पुरस्काराने सम्मानित केले आहे.
Former Mastercard CEO Ajay Banga has been elected as the next president of the World Bank.https://t.co/QXgZn9df4w
— IndiaToday (@IndiaToday) May 3, 2023
पहिले भारतवंशीय अध्यक्ष ठरतील
अजय बंगा (Ajay Banga) यांचा जन्म पुण्यात १० नोव्हेंबर १९५९ रोजी झाला होता. त्यांचे वडील हरभजन सिंह बंगा भारतीय सेनेत लेफ्टनंट जनरल होते. बंगा हे वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष बनणारे पहिले भारतवंशीय आहेत. ६३ वर्षीय बंगा हे सध्या प्रायव्हेट इक्विटी फंड जनरल अटलांटिकचे उपाध्यक्ष आहेत.
हेही पहा –
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दोन महिन्यांपूर्वी बंगा (Ajay Banga) यांच्या नावाची शिफारस केली होती. या पदासाठी शिफारस झालेले ते भारतीय वंशाचे पहिलेच व्यक्ती आहेत. जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी एप्रिल २०२४ पूर्वी पायउतार होण्याची घोषणा केली होती. त्यानंतर बंगा यांच्या नावाची शिफारस करण्यात आली.
Join Our WhatsApp Community