श्री श्रीनिवासन (Shri Srinivasan) हे भारतीय वंशाचे अमेरिकन वकील आणि न्यायाधीश आहेत. ते कोलंबिया सर्किटसाठी युनायटेड स्टेट्स कोर्ट ऑफ अपिल्स येथे चीफ युनायटेड स्टेट्स सर्किट जज म्हणून काम करतात. श्रीनिवासन यांनी सर्किट जज म्हणून काम करण्याआधी युनायटेड स्टेट्सचे प्रिन्सिपल डेप्युटी सॉलिसिटर जनरल म्हणूनही काम केलं आहे आणि युनायटेड स्टेट्सच्या सुप्रीम कोर्टात पंचवीस खटले लढवले आहेत. तसेच त्यांनी हॉवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये वकिली शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक व्याख्याने दिली आहेत. (Shri Srinivasan)
श्रीनिवासन यांचा जन्म २३ फेब्रुवारी १९६७ साली भारतात चंदिगड येथे झाला. त्यांचे कुटुंब ब्राह्मण अय्यंगार हिंदू तामिळ आहे. श्रीनिवासन (Shri Srinivasan) चार वर्षांचे असताना त्यांचं कुटुंब कायमस्वरूपी युनायटेड स्टेट्सच्या लॉरेन्स आणि कान्स या ठिकाणी राहायला गेले. त्यांचे बाबा कान्स इथल्या युनिव्हर्सिटीमध्ये गणिताचे प्रोफेसर म्हणून काम करायचे. श्रीनिवासन यांच्या आई सुरुवातीला कान्स सिटी आर्ट इन्स्टिट्यूट येथे शिकवत होत्या. त्यानंतर त्यांनी कान्स युनिव्हर्सिटीच्या कंप्युटर सायन्स डिपार्टमेंटमध्ये काम केलं. (Shri Srinivasan)
(हेही वाचा – Manohar Joshi : मनोहर जोशी यांच्या जीवनातील ‘ती’ कटू आठवण कोणती होती?)
अतिशय प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून श्रीनिवासन यांना मान
श्रीनिवासन यांनी १९८५ साली लॉरेन्स हायस्कूल येथून आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. हायस्कूलला असताना श्रीनिवासन बास्केटबॉलसुद्धा खेळायचे. त्यानंतर त्यांनी १९८९ साली स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटीमधून डिस्टिंगशन मिळवून बॅचलर ऑफ आर्ट ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर श्रीनिवासन यांनी १९८९ ते १९९१ सालादरम्यान कंट्री मॅनेजरच्या ऑफिसमध्ये मॅनेजमेंट एनॅलिसिस्ट म्हणून काम केलं. हे काम करत असतानाच श्रीनिवासन (Shri Srinivasan) यांनी स्टँडफोर्ड लॉ स्कूल आणि स्टँडफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस येथे ऍडमिशन घेतले आणि अभ्यास सुरू केला. (Shri Srinivasan)
१९९५ साली त्यांनी JD-MBA ही पदवी मिळवली. श्रीनिवासन हे स्टँडफोर्ड लॉ रिव्ह्यूचे संपादकीय काम सांभाळायचे. पुढे त्यांनी ऑर्डर ऑफ कॉईफ ऑनर्स ही पदवी प्राप्त केली. श्रीनिवासन (Shri Srinivasan) यांना दोन मुलं आहेत. सध्या ते आपल्या कुटुंबासोबत व्हर्जिनिया येथे राहतात. भारतीय वंशाचे अतिशय प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्यांना मान आहे. (Shri Srinivasan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community