पणजीत 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत होत असलेल्या 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वात महत्त्वाचा विभाग इंडियन पॅनोरमाचा शुभारंभ सर्वत्र गाजलेला रणदीप हुडा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantra veer Savarkar) या चित्रपटाने झाला. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हुडा यांचा सन्मान केला. याप्रसंगी दिग्दर्शक रणदीप हुडा म्हणाले, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांती करणे, हा पण एक भाग होता. या विभागात 25 चित्रपट तर 20 लघुपटांचा समावेश आहे. 384 चित्रपटांतून निवडलेल्या 25 चित्रपटात पाच चित्रपट हे मुख्य प्रवाहातील आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेल्या सशस्त्र क्रांतीवर प्रकाश टाकण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantra veer Savarkar) चित्रपट बनवण्यात आला आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात सशस्त्र क्रांतीचा सखोल अभ्यास, गांधी विरुद्ध सावरकर वैचारिक युद्ध, अंदमान येथे क्रांतीकारकांना भोगवा लागलेला त्रास, ‘अभिनव भारत’ने देशासाठी दिलेले योगदान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना दाखवण्यात आल्या आहेत. ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात एकूण २५ ‘फिचर’ चित्रपट, तर २० ‘नॉन फिचर’ चित्रपट दाखवले जाणार आहेत.
(हेही वाचा Maharashtra Assembly Election Result : महायुतीसोबत राहणार की Ajit Pawar ‘मविआ’त जाणार?)
‘या’ पंचवीस चित्रपटांची निवड
इंडियन पॅनोरमाच्या चित्रपट विभागात रणदीप हुडा दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra veer Savarkar), गुऊराज बी यांचा केरेबेटे, सागर पुराणिक यांचा वेंक्या, जादूमोनी दत्ता यांचा जुईफूल, अश्विन कुमार यांचा महावतार नरसिम्हा, कार्तिक सुब्बाराज यांचा जिगर थंडा डबल एक्स, ब्लेसी यांचा आटुजीवीत, आदित्य सुहास जांभळे यांचा आर्टिकल 370, शशी चंद्रकांत खंदारे यांचा जिप्सी, तुषार हिरानंदानी यांचा श्रीकांत, शिबोप्रसाद मुखर्जी यांचा आमार बॉस, ब्रम्हयुगम मल्याळम, 35 चिन्ना कथा काडू तेलुगु, राडोर पाखी आसामी, घरात गणपती, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, रावसाहेब, लेव्हल क्रॉस, कारकेन, भूतपोरी, बंगाली, सौकार्य घोषाल, ओंको की कोथिन, बंगाली, सौरव पालोधी यांची निवड झाली आहे. मुख्य प्रवाहातील सिनेमा विभागात कारखानू, 12वी फेल, मंजुम्मेल बॉईज, स्वर्गरथ, कल्की यांचा समावेश आहे. याशिवाय 262 लघुपटांतून निवडलेले 20 लघुपट इफ्फीमध्ये दाखविण्यात येणार आहेत.
Join Our WhatsApp Community