पोस्ट ऑफीसमधून खातेधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पोस्ट ऑफीसमधून आता खातेदार इलेक्ट्राॅनिक पद्धतीने पैसे ट्रान्सफर करु शकणार आहेत. विभागाने 17 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकात NEFT आणि RTGS ची सुविधा टपाल कार्यालयाकडून सुरु करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पोस्ट ऑफीसच्या ग्राहकांना पैसे पाठवणे पूर्वीपेक्षा सोपे होणार
विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार, NEFT 18 मे पासूनची सुविधा सुरु झाली आहे. तसेच, RTGSची सुविधा 31 मे पासून उपलब्ध होणार आहे. आता पोस्ट ऑफीसच्या ग्राहकांना पैसे पाठवणे पूर्वीपेक्षा सोपे होणार आहे. अशा परिस्थितीत ही सुविधा 31 मे 2022 पासून सुरु होण्याची अपेक्षा आहे.
( हेही वाचा: महाराष्ट्राचा हापूस थेट जो बायडन यांच्या दारी! )
ही एक जलद प्रक्रिया
NEFT आणि RTGS च्या माध्यमातून, तुम्ही तुमच्या खात्यातून कोणत्याही खात्यात इलेक्टाॅनिक पद्धतीने निधी हस्तांतरित करु शकता. पैसे हस्तांतरित करण्याची ही एक जलद प्रक्रिया आहे. NEFT मध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची मर्यादा नाही, तर RTGS मध्ये एकावेळी किमान 2 लाख रुपये पाठवावे लागतात. NEFT आणि RTGS द्वारे पैसे अधिक वेगाने पोहोचतात.
Join Our WhatsApp Community