भारतीय रेसिंग ड्रायव्हरमध्ये करुण चंडोकचं (Karun Chandhok) नाव घ्यायलाच हवे. त्याने अनेक स्पर्धांवर आपलं विजेतेपद कोरले आहे. २०१० मध्ये फॉर्म्युला वनमध्ये हिस्पानिया रेसिंगमध्ये त्याने भाग घेतला होता. याआधी त्याने GP2 सीरीजमध्ये तीन वर्षे ड्रायव्हिंग केले, त्यामध्ये दोन स्पर्धा खिशात घातल्या. २०१३ मध्ये त्याने सेफार्थ मोटरस्पोर्टसाठी FIA GT सीरीजमध्ये भाग घेरला. महिंद्र रेसिंगसाठी फॉर्म्युला ई ही स्पर्धा त्याची शेवटची स्पर्धा होती.
चंडोकचा जन्म १९ जानेवारी १९८४ रोजी तामिळनाडू येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव विकी चंडोक. अनेक भारतीय रॅलींग चॅम्पियनशिपवर त्यांनी आपले नाव कोरले होते. तसेच फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाचे ते २००३ पासून अध्यक्ष आहेत. २००० मध्ये करुण चंडोक (Karun Chandhok) हा भारतीय राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियन ठरला होता. यामध्ये त्याने फॉर्म्युला मारुती सीरीजमध्ये दहा पैकी सात शर्यती जिंकल्या होत्या.
२००१ मध्ये चंडोकने फॉर्म्युला २००० आशिया चॅम्पियनशिप जिंकली. तो सर्वात तरुण आशियाई फॉर्म्युला चॅम्पियन झाला. चंडोकने अनेक मोटरस्पोर्ट प्रशासकीय संस्थांमध्ये योगदान दिले आहे. २०२१ पासून तो मोटरस्पोर्ट यूकेच्या संचालक मंडळावर काम करत आहे. ते FIA ड्रायव्हर्स कमिशनचा सदस्य देखील आहे. बीबीसी आणि चॅनल ४ यासह फॉर्म्युला वनच्या कव्हरेजचा भाग म्हणून चंडोकने विविध ब्रिटीश ब्रोडकास्टर्ससाठी काम केले आहे. २०२१ पर्यंत तो स्काय स्पोर्ट्ससाठी विश्लेषक तसेच सह-समालोचक आणि पिट-लेन रिपोर्टर म्हणून काम करत होता. तो चॅनल ५ च्या प्रोग्राम फिफ्थ गियरवर प्रेझेंटर आणि रिपोर्टर म्हणून देखील झळकला.
Join Our WhatsApp Community