‘मी वकील आहे’; लोकलमधील तरुणीच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर भडकले नेटकरी

166

मुंबई लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक प्रवासी समोरच्या सीटवर बसलेल्या जोडप्याशी वाद घालताना दिसत आहे. वास्तविक, तरुणी समोरच्या सीटवर पाय पसरुन बसली होती. समोर बसलेल्या प्रवाशाने तिली पाय खाली ठेवण्यास सांगितले. मात्र, तिने काही ऐकले नाही. याउलट या जोडप्याने समोरच्या प्रवाशासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर प्रवाशाने तुम्ही कोण आहात असे विचारले असता, मी वकील आहे आणि आम्ही पाय पसरुनच ट्रेनमध्ये बसणार आहोत, असे ते म्हणाले. या घटनेचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. समोर बसलेल्या प्रवाशाने ही घटना आपल्या मोबाईलमधील कॅमे-यात रेकाॅर्ड केली.

लोकमध्ये समोरच्या सीटवर चप्पल घालून पाय पसरुन बसलेली ही तरुणी व्हिडीओ शूट करणा-या प्रवाशाकडून कॅमेरा हिसकावण्याचा देखील प्रयत्न करताना आपल्याला दिसते. प्रवाशाने हा व्हिडीओ ट्वीटरवर पोस्ट केला आणि मुंबई पोलीस आणि मध्य रेल्वेलादेखील टॅग केले आहे.

( हेही वाचा: डिजिटल स्ट्राईक: 232 चिनी अॅप्सवर भारताने घातली बंदी )

पोलिसांनी दिले तपासाचे आदेश

या घटनेनंतर मुंबई पोलिसांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर या पोस्टवर लोक आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत. काही नेटक-यांच्या म्हणण्यानुसार, व्हिडीओ बनवून या तरुणाने योग्यच केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.