IRCTC: ऑनलाइन रेल्वे तिकीट बुक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या आणि भारतीय रेल्वेच्या IRCTC वेबसाइट/अॅपद्वारे ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी, भारतीय रेल्वेने एका युजर आयडीवरून एका महिन्यात जास्तीत जास्त 6 तिकिटांच्या बुकिंगची मर्यादा 12 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या प्रवाशांचे आधार कार्ड लिंक नाही त्यांच्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. इतकेच नाही तर ज्या प्रवाशांचे अकाऊंट आधारशी लिंक आहे अशा यूजर आयडीवर एका महिन्यात जास्तीत जास्त 12 तिकिटे बुक करण्याची मर्यादा 24 तिकिटांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

सध्या, IRCTC वेबसाइट/अॅपद्वारे तिकीट बुकिंग करताना  तुम्हाला एका युजर आयडीद्वारे एका महिन्यात जास्तीत जास्त 6 तिकिटे ऑनलाइन बुक करण्याची परवानगी मिळते. ज्यांचा युजर आयडी आधारशी जोडलेला आहे ते एका महिन्यात IRCTC वेबसाइट/अॅपवर जास्तीत जास्त 12 तिकिटे बुक करू शकतात. असे केल्यास रेल्वे तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशाचे तिकीट आधारशी पडताळता येते.

(हेही वाचा – Indian Railways New Rule: आता रेल्वेत तुमचे सामान हरवले तरी नो टेन्शन, रेल्वेने सुरू केली भन्नाट सुविधा)

यापूर्वी रेल्वेकडून ऑनलाइन तिकीट बुक करण्याच्या पद्धतीतही मोठा बदल करण्यात आला आहे. आता प्रवाशांना रेल्वे तिकीट काढण्यासाठी खूप कमी वेळ लागणार आहे. नव्या नियमानुसार प्रवाशांना तिकीट काढताना त्यांच्या गंतव्यस्थानाची आणि पत्त्याची माहिती द्यावी लागणार नाही. यापूर्वी बुकिंग करताना प्रवाशांना पत्ता भरण्यासाठी 2 ते 3 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत असे. आता तो वेळही वाचणार असून, यामुळे ऑनलाइन तिकीट बुकिंग लवकरच होणार आहे. तत्काळ तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या या निर्णयाचा सर्वाधिक फायदा होणार आहे, कारण तत्काळ तिकीट काढताना प्रवाशांकडे खूप कमी वेळ असल्याने वेळेची सर्वाधिक काळजी घ्यावी लागते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here