तुम्हाला भारतीय रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य रेल्वेने विविध नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) या पदांवर भरती काढली आहे. या पदांवर अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तुम्ही या पदावर अर्ज करण्यास इच्छुक असाल तर WCR च्या अधिकृत साइट wcr.indianrailways.gov.in वर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
(हेही वाचा – तुम्ही चहाचे शौकिन आहात? तर चहासोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी)
नोंदणी करण्याची शेवटची तारीख 28 जुलै असून या भरती प्रक्रियेतून 121 पदांवर मोठी भरती होणार आहे. या पदांवर भरती निघाली असल्याची अधिसूचना 6 जुलै रोजी जारी करण्यात आली होती. तर यासाठी नोंदणी प्रक्रिया 8 जुलैपासून सुरू झाली आहे. त्यासाठी उमेदवारांना 20 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. म्हणजेच 28 जुलैपर्यंत यासाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
कोणत्या पदांवर होणार भरती
या भरती प्रक्रियेतून स्टेशन मास्तरची 8 पदे, वरिष्ठ व्यावसायिक कम तिकीट लिपिक म्हणजेच सीनियर कमर्शियल कम टिकट क्लर्कची 38 पदे, वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक (सीनियर क्लर्क कम टाइपिस्ट) 9 पदे, वाणिज्य सह तिकीट लिपिक (कमर्शियल कम टिकट क्लर्क) 30 पदे, लेखा लिपिक सह टंकलेखक (अकाऊंट्स क्लर्क कम टाइपिस्ट) 8 पदे, कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक (जूनियर क्लर्क कम टाइपिस्ट) 28 पदांवर भरती होणार आहे. म्हणजेच या भरती प्रक्रियेतून एकूण 121 पदांवर नेमणूक केली जाणार आहे.
या पदांसाठी आवश्यक पात्रता
स्टेशन मास्टर, सीनियर कमर्शियल कम तिकीट क्लर्क आणि सीनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. तर इतर पदांसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे.
कोणत्या पदासाठी किती पगार
- स्टेशन मास्तर रु. 35,400 प्रति महिना,
- वरिष्ठ वाणिज्य सह तिकीट लिपिक (सीनियर कमर्शियल कम टिकट क्लर्क) रु. 29,200 प्रति महिना,
- वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक (सीनियर क्लर्क कम टाइपिस्ट) रु. 29,200 प्रति महिना,
- वाणिज्य सह तिकीट लिपिक (कमर्शियल कम टिकट क्लर्क) रु. 21, 700 प्रति महिना,
- लेखा लिपिक सह टंकलेखक (अकाऊंट्स क्लर्क कम टाइपिस्ट) रु. 19,900 प्रति महिना
- कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक (जूनियर क्लर्क कम टाइपिस्ट) प्रति महिना 19,900 रु.