Indian Railways: चुकूनही ट्रेनमध्ये ‘या’ 4 गोष्टी घेऊन जाऊ नका; नाहीतर तुरूंगात जावं लागेल आणि…

164

शक्यतो सर्वच जण ट्रेनने प्रवास करणं पसंत करतात. तुम्ही देखील ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ट्रेनने प्रवास करताना, आपण अनेकदा बस आणि फ्लाइटच्या तुलनेत जास्त सामान घेऊन जातो. मात्र जर तुमचे सामान जास्तच दिसले, तर TTE तुमच्यावर दंड देखील करू शकते. पंरतू ट्रेनमध्ये प्रवास करताना या 4 वस्तू नेण्यास पूर्णपणे बंदी आहे. तपासणीदरम्यान टीटीईला त्याची माहिती मिळाल्यास तुम्हाला थेट तुरुंगवास आणि मोठा दंडही भरावा लागेल. कोणत्या आहेत त्या 4 गोष्टी, ज्या तुम्ही कधीही ट्रेनमध्ये चुकूनही नेता कामा नये, जाणून घ्या…

(हेही वाचा – Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! या एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्यांना मिळणार FREE नाश्ता-जेवण!)

अॅसिड (Acid)

भारतीय रेल्वेत ऍसिडची बाटली नेण्यास पूर्णपणे बंदी आहे. जर एखाद्या प्रवाशाने त्याच्यासोबत अॅसिड नेले तर त्याला रेल्वे कायद्याच्या कलम 164 अंतर्गत तात्काळ अटक केली जाऊ शकते. या कलमांतर्गत अॅसिडची बाटली बाळगल्याबद्दल 1,000 रुपये दंड किंवा 3 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

स्टोव्ह किंवा गॅस सिलेंडर

इतर ठिकाणी काम करणारे लोक घरी परतताना अनेकदा स्टोव्ह आणि सिलिंडर रेल्वेने सोबत घेऊन जातात. ट्रेनमध्ये गॅस सिलिंडर आणि स्टोव्ह घेऊन जाणे रेल्वे कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. जर एखाद्याला सिलिंडर घेऊन जायचे असेल तर रेल्वेची पूर्वपरवानगी घेऊनच रिकामे सिलिंडर सोबत नेण्यास परवानगी आहे. जर भरलेले सिलिंडर आढळल्यास त्या प्रवाशाला तुरुंगवास आणि मोठ्या दंडाला सामोरे जावे लागू शकते.

फटाके

भारतीय रेल्वेत फटाके घेऊन जाण्यास पूर्णपणे बंदी आहे. जर फटाक्यांच्या स्फोटामुळे ट्रेनमध्ये मोठी आग आणि जीवितहानी होऊ शकते. ट्रेनमध्ये कोणीही फटाके आपल्या सोबत नेताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई होऊ शकते. त्याला मोठा दंड तसेच तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे तुम्ही अशी चूक कधीही करू नका आणि ट्रेनमधून प्रवास करताना फटाके सोबत घेऊन जाऊ नका.

शस्त्रे आणि हत्यारे

तुम्ही ट्रेनने प्रवास करताना तलवार, चाकू, भाला, खंजीर, रायफल किंवा परवानाकृत शस्त्रे वगळता इतर कोणतीही प्राणघातक शस्त्रे घेऊन जाऊ शकत नाही आणि तुमच्याकडे कोणतेही शस्त्र आढळले तर तुमच्यावर रेल्वे कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तत्काळ कारवाई होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.