भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांचा नेहमीच विचार करत असते, त्यामुळे रेल्वे आपल्या सुविधा सतत अपडेट करत असते. भारतीय रेल्वेला देशाची LifeLine म्हटले जाते. भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे नेटवर्क असून जे देशभरात दूरवर पसरलेले आहे. काश्मीर असो किंवा कन्याकुमारी, लोक त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी रेल्वेचा पर्याय निवडणं आजही पसंत करतात. रेल्वेच्या अशा अनेक सेवा आहेत ज्या मोफत दिल्या जातात आणि त्या फार कमी माहित आहे. त्या सेवा कोणत्या आहेत तुम्हाला माहिती आहे का…
(हेही वाचा – Indian Railways: ट्रेनमध्ये कोणी तुमची सीट बळकावली तर असा द्या दणका!)
रेल्वे प्रवाशांना देते या भन्नाट सुविधा
जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर तिकीट बुकिंग दरम्यान, रेल्वे प्रवाशांना क्लास अपग्रेडेशनची सुविधा पुरवते. ही सुविधा म्हणजेच, स्लीपरच्या प्रवाशाला थर्ड एसी आणि थर्ड एसी प्रवाशाला सेकंड एसी आणि सेकंड एसीच्या प्रवाशाला फर्स्ट एसीची सुविधा त्याच भाड्यात मिळू शकते. ही सुविधा मिळवण्यासाठी रेल्वे प्रवाशांना तिकीट बुकिंग दरम्यान ऑटो अपग्रेड या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर, उपलब्धतेनुसार, रेल्वे तिकीट अपग्रेड करते. मात्र, दरवेळी तिकीट अपग्रेड झालेच पाहिजे असे नाही.
त्याचप्रमाणे, वेटिंग लिस्ट प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनमध्ये सीट उपलब्धतेच्या आधारे रेल्वेमध्ये प्रवास करण्याची संधी देते. त्यासाठी रेल्वेने विकल्प सेवा सुरू केली आहे. ज्या प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळू शकत नाही असे प्रवासी दुसऱ्या ट्रेनमध्ये बसण्याचा पर्याय निवडू शकतात. यासाठी तिकीट बुकिंगच्या वेळी पर्याय निवडावा लागतो, त्यानंतर रेल्वे ही सुविधा प्रवाशांना पुरविते.
तिकीट करता येणार दुसऱ्याच्या नावे टान्सफर
रेल्वे तिकीट ट्रान्सफर करण्याचा पर्यायही देते. जर एखादा व्यक्ती कोणत्याही कारणास्तव प्रवास करू शकत नसेल तर ती व्यक्ती आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर ते तिकीट ट्रान्सफर करू शकते. दरम्यान, प्रवासाच्या दिवसाच्या 24 तासांपूर्वी हे तिकीट हस्तांतरण केले जाऊ शकते.
या सेवेंतर्गत हे तिकीट फक्त आई, वडील, बहीण, मुलगा, मुलगी, पती आणि पत्नी यांच्या नावावर ट्रान्सफर करता येणार आहे. यासाठी तुम्हाला तिकिटाची प्रिंट घेऊन जवळच्या रेल्वे स्टेशनवर जावे लागेल. जिथे तिकीट धारकाच्या आयडी प्रूफद्वारे तिकीट ट्रान्सफर केले जाऊ शकते.
बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा
तिकीट ट्रान्सफरप्रमाणे, बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा देखील रेल्वेकडून 24 तास अगोदर उपलब्ध आहे. म्हणजेच, जर एखाद्या प्रवाशाने दिल्लीहून तिकीट काढले असेल आणि त्याला त्या रेल्वे मार्गावरील इतर कोणत्याही स्थानकावरून बोर्डिंग म्हणजेच चढायचे असेल तर तो त्याचे स्थानक बदलू शकतो. हा बोर्डिंग स्टेशनमधील बदल ऑनलाइन करता येत असल्याचे सांगितले जात आहे. IRCTC वेबसाइट किंवा अॅपमध्ये लॉग इन केल्यानंतर, तुम्ही बुक केलेल्या तिकीट हिस्ट्रीवर जाऊन बोर्डिंग स्टेशन बदलू शकता. हा बदल केवळ एकदाच उपलब्ध आहे.
Join Our WhatsApp Community