भारतातील कित्येक सामान्य नागरिक प्रवास करण्यासाठी भारतीय रेल्वेचा मार्ग निवडतात. कमी खर्चात खिशाला परवडेल अशा लांब पल्ल्यांचा प्रवास करण्यासाठी रेल्वे हा उत्तम पर्याय आहे. मात्र रेल्वेने प्रवास करताना कित्येकांना आपले सामान चोरीला जाण्याची भिती असते. चोरीच्या घटना घडू नये म्हणून बरेच प्रवासी वेगवेगळ्या पद्धतीचा मार्ग अवलंबतात. काही रेल्वे प्रवासी झोपताना आपले सामान डोक्याजवळ घेतात तर काही लोखंडी साखळीने दे बांधून सीट खाली ठेवतात. पण रेल्वेच्या नियमानुसार, तुम्हाला तुमचा चोरी झालेला माल किंवा सामान मिळाले नाही तर काही काळानंतर तुम्हाला चोरी झालेल्या सामानाच्या किमतीएवढी नुकसान भरपाई घेण्याचा अधिकार आहे. असे असले तरी आता रेल्वेत तुमचे सामान हरवले तरी टेन्शन घेण्याचे काही कारण नाही. कारण रेल्वेने अशी भन्नाट सुविधा सुरू केली आहे ज्यामुळे हरवलेले सामान मिळणं शक्य आहे.
(हेही वाचा – New Traffic rules: हेल्मेट असेल तरी भरावा लागू शकतो दंड, कारण…)
वस्तूंची सुरक्षा आणि सुरक्षितता
मिळालेल्या माहितीनुसार, आता पश्चिम रेल्वेने रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF) सहकार्याने ‘मिशन अमानत’ हे अनोखे अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत प्रवाशांना त्यांच्या हरवलेल्या सामानाचा शोध घेणे आणि ते सामान परत मिळवणे सहज शक्य होणार आहे. या नियमांतर्गत प्रवाशांच्या सामानासह त्यांच्या सुरक्षिततेचाही निर्णय घेतला जात आहे. हरवलेले सामान परत मिळणे सोपे व्हावे यासाठी पश्चिम रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने पुढाकार घेतला असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या वतीने ट्विट करून देण्यात आली आहे.
( हेही वाचा – ट्रेनच्या प्रवासाला आता विमानाचा नियम, इतक्याच वजनाचं लगेज फ्रीमध्ये नेता येणार)
कुठे पाहता येणार हरवलेल्या सामानाची यादी
‘मिशन अमानत’ अंतर्गत हरवलेल्या सामानाची माहिती तुम्हाला फोटोंसह पश्चिम रेल्वेच्या वेबसाइटवर पाहता येणार आहे. यासह, प्रवाशांना आरपीएफ वेबसाइट http://wr.indianrailways.gov.in वर फोटोसह हरवलेल्या सामानाची यादी तुम्हाला बघता येणार आहे. पश्चिम रेल्वेने असे सांगितले की, पश्चिम रेल्वे विभागाच्या रेल्वे संरक्षण दलाने 1,317 रेल्वे प्रवाशांकडून 2.58 कोटी रुपयांचा माल जप्त केला. तपासणी केल्यानंतर हरवलेले सामान त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आला. पश्चिम रेल्वे आरपीएफ ‘मिशन अमानत’ अंतर्गत २४ तास काम करत असल्याचे ही पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community