30 सप्टेंबरपासून ‘या’ मार्गावर धावणार ‘वंदे भारत’, किती असणार भाडे?

‘वंदे भारत’ ट्रेनने जगातील सर्वांत वेगवान रेल्वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलेट ट्रेनला मागे टाकले आहे. यानंतर 30 सप्टेंबरला रेल्वेकडून सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारताची अपग्रेडेड व्हर्जन वंदे भारत 2 लाँच करण्याची तयारी सुरू आहे. अपग्रेडेड व्हर्जन वंदे भारत 2 ही ट्रेन 30 सप्टेंबर रोजी अहमदाबादकडून मुंबईसाठी रवाना होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र रेल्वेकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

(हेही वाचा – ‘वंदे भारत’ने तोडला बुलेट ट्रेनचा रेकॉर्ड!)

अहमदाबाद ते मुंबई दरम्यानचे 492 किमी अंतर ‘वंदे भारत’ने अवघ्या पाच तासांमध्येच कापले. त्यामुळे वेगवान प्रवास करण्यासाठी आणि वंदे भारतच्या प्रवासी भाड्याबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या वंदे भारतमधील एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी प्रवाशांना 2 हजार 349 रूपये भाडं लागणार आहे. तर चेअर कारचे मूळ भाडं 1 हजार 144 रूपये असल्याचे सांगितले जात आहे. मात्र यामध्ये जीएसटीचा समावेश नसल्याचीही माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारत मुंबई आणि अहमदाबाद दोन स्थानकांवर थांबणार आहे. त्यामुळे देशातील दोन आर्थिक शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. अहमदाबाद ते सूरत या वंदे भारतच्या एक्झिक्युटिव्ह क्लासचे मूळ भाडे 1 हजार 312 रूपये तर चेअर कारसाठी 634 रूपये आकारण्यात येणार आहे. एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये सूरत ते मुंबईचे मूळ भाडे 1 हजार 522 रूपये आणि चेअरकारसाठी 739 रूपये भाडे असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here