- ऋजुता लुकतुके
भारताचा बांधकाम उद्योग २०४७ पर्यंत ५.८ ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचेल. आणि यात रहिवासी संकुलांचा वाटा जास्त असेल, असा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. २०४७ सालापर्यंत भारतीय बांधकाम उद्योग ५.८ ट्रलियन अमेरिकन डॉलर इतका वाढलेला असेल. आणि जीडीपीतील रियल इस्टेट क्षेत्राचा वाटा १५ टक्के असेल असा अंदाज नाईट फ्रँक अँड नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सिल या संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या संयुक्त अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. बांधकाम उद्योगाचा सध्याचा वाटा ७ टक्क्यांचा आहे.
‘इंडिया रियल इस्टेट-व्हिजन २०४७’ असं या अहवालाचं नाव आहे. २०४७ मध्ये देशाची अर्थव्यवस्था ३३ ते ४० ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकी झालेली असेल. आणि यात रियल इस्टेटचाही महत्त्वाचा वाटा असेल. तर रियल इस्टेट क्षेत्राच्या भरभराटीत रहिवासी संकुलांचा वाटा मोठा असेल असा प्राथमिक अंदाज या अहवालात मांडण्यात आला आहे. देशाच्या बांधकाम उद्योगातील काही महत्त्वाची निरीक्षणं या अहवालातून समोर येतात. त्यानुसार, देशातील बांधकाम क्षेत्रात संस्थात्मक खाजगी गुंतवणूक वाढतेय. म्हणजेच रियल इस्टेट कंपन्यांमध्ये शेअर तसंच म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून गुंतवणूक वाढतेय. आणि २०४७ पर्यंत ही गुंतवणूक ५४.३ अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात पोहोचेल, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. खाजगी गुंतवणुकीचा विकास दर ९.५ टक्के इतका असेल.
(हेही वाचा – Talathi Exam :पेपर फोडणाऱ्या आरोपीलाच मिळाले १३८ गुण)
त्याचवेळी रहिवासी संकुलांबरोबरच कमर्शियल, वेअरहाऊस, औद्योगिक अशा गरजाही वाढतील असं निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आलं आहे. तर कमी उत्पन्न गटांची रिअल इस्टेटमधील गुंतवणूक मात्र ९ टक्क्यांपर्यंत कमी होईल, असा अंदाज यात व्यक्त करण्यात आला आहे. नाईट फ्रँक संस्थेचा असा अंदाज आहे की, २०४७ पर्यंत देशातील ६९ टक्के लोकसंख्या ही कमावती असेल. आणि त्यांच्या सहभागामुळेच देशाची अर्थव्यवस्था ३६ ट्रलियन अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचेल. आणि त्यामुळे देशाचं उत्पादन २०४७ पर्यंत ४७३ अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचेल असही संस्थेचा अंदाज आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community