बाराव्या वर्षीच रौप्य पदक पटकावणारा भारतीय नेमबाज Jaspal Rana

74
बाराव्या वर्षीच रौप्य पदक पटकावणारा भारतीय नेमबाज Jaspal Rana

जसपाल राणा (Jaspal Rana) हा एक भारतीय नेमबाज आहे. त्याने आतापर्यंत बहुतेक करून २५ मीटर सेंटर फायर पिस्तुल स्पर्धेत भाग घेतला आहे. जसपाल राणा याने १९९४ साली आशियाई खेळांत आणि १९९८ साली राष्ट्रकुल खेळांमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. याव्यतिरिक्त त्याने मेन्स सेंटर फायर पिस्तुल, २००२ साली राष्ट्रकुल मेन्स २५ मीटर्स सेंट्रल फायर पिस्तुल, २००६ साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, २ मीटर फायर पिस्तुल मेन्स आणि २००६ आशियाई खेळांमध्ये भाग घेतला आहे. सध्या जसपाल राणा देहराडून इथल्या इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या ठिकाणी प्रशिक्षक म्हणून काम करतो. (Jaspal Rana)

१९८८ साली अहमदाबाद येथे भरवण्यात आलेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत जसपाल राणा (Jaspal Rana) याने रौप्यपदक जिंकलं होतं. त्या वेळेस तो बारा वर्षांचा होता. पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर नेमबाजीच्या स्पर्धेत तो उतरला होता. त्यावेळेस त्याचं खूप कौतुक केलं गेलं. १९९४ साली इटली इथल्या मिलान येथे भरवण्यात आलेल्या ४६व्या जागतिक स्तरावरच्या नेमबाजी स्पर्धेत जसपाल राणा याने ज्युनियर सेक्शनमधून कित्येक जागतिक विक्रम करून आंतरराष्ट्रीय गौरव मिळवला. (Jaspal Rana)

(हेही वाचा – T20 World Cup, Rohit Sharma : इंग्लंड विरुद्धच्या विजयानंतर रोहित शर्मा ड्रेसिंग रुममध्ये भावूक झाला ‘तो’ क्षण)

तसंच २००६ साली दोहा येथे भरवण्यात आलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा महोत्सवात त्याने २५ मीटर सेंटर फायर पिस्तुल स्पर्धेत ५९० गुण मिळवून विश्वविक्रमाची बरोबरी केली होती. यापूर्वी सुद्धा दोनदा १९९५ साली कोईम्बतूर आणि १९९७ साली बंगळुरू येथे भरवण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये त्याने हा स्कोअर केला होता. त्याव्यतिरिक्त त्याने १९९८ सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं होतं. त्यानंतर २००२ आणि २००६ सालच्याही राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये जसपाल राणा याने उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. (Jaspal Rana)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.