Indian Smartphone Market : भारतीय मोबाईल फोन बाजारपेठेत आयफोनची हिस्सेदारी सर्वाधिक

Indian Smartphone Market : ॲपल कंपनीने गेल्यावर्षी भारतात १ लाख कोटी रुपये किमतीचे आयफोन बनवले

220

ॲपल कंपनीने आयफोनचं भारतात उत्पादन सुरू केल्यानंतर कंपनीचा भारतातील महसूलही वाढलयाचं दिसतंय. २०२३ या कॅलेंडर वर्षात ॲपल कंपनीने भारतात १ लाख कोटी रुपयांचे आयफोन बनवले. आणि त्यामुळे महसूलाच्या निकषावर भारताच्या मोबाईल फोन (Indian Smartphone Market) बाजारपेठेतही त्यांनी जोरदार मुसंडी मारली आहे.

कंपनीने भारतातील उत्पादन तर वाढवलंच. शिवाय भारतीय बाजारपेठेत १० लाख मोबाईल फोन एका वर्षांत विकलेही. त्यामुळे ॲपल कंपनीची हिस्सेदारी पहिल्यांदाच अव्वल राहिली आहे. काऊंटरपॉइंट रिसर्स संस्थेनं सादर केलेल्या अहवात ही माहिती देण्यात आली आहे. ॲपलची हिस्सेदारी प्रचंड स्पर्धा असलेल्या भारतीय मोबाईल (Indian Smartphone Market) बाजारपेठेत आता ६ टक्के झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यात २८ टक्क्यांची वाढ झाली आहे.

(हेही वाचा Bmc budget 2024-25 महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा आकडा आणखी वाढणार; काय आहे कारण?)

‘कंपनीने भारतात स्वत:ची रिटेल दुकानं उघडली. जाहिरातींमुळे फोनची विक्री वाढली. आणि नवीन मॉडेल बरोबरच भारतात जुन्या आयफोन मॉडेलचीही तुलनेनं जास्त विक्री झाली. फोनच्या विक्रीवर एक्सचेंज आणि इतर सवलती दिल्यामुळेही भारतीय ग्राहकांवर त्याचा परिणाम झाला,’ असं काऊंटरपॉइंट रिसर्चचे शुभमन सिंग यांनी अहवालात म्हटलं आहे.

ॲपल कंपनीने २०२३ मध्ये भारतात १ लाख कोटी रुपये किमतीचे आयफोन बनवले. आणि यातील ६५,००० लाख कोटी रुपये किमतीचे आयफोन भारतातून निर्यात झाले. महसूलाच्या निकषांवर आयफोन सगळ्यात पुढे आहे. तर विक्रीच्या निकषावर आजही सॅमसंगची मक्तेदारी भारतात कायम आहे. इथं सॅमसंगची हिस्सेदारी १८ टक्के इतकी आहे. तर त्या खालोखाल विवोची हिस्सेदारी १७ टक्के आहे. शिओमी तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०२३ मध्ये भारतात विकल्या गेलेल्या फोनमध्ये ५२ टक्के फोन हे ५जी सुविधा असलेले होते. तर दर ३ फोन मागे एक फोन हा हफ्त्यांवर किंवा कुठल्या ना कुठल्या फायनान्स स्कीमवर घेतलेला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.