‘मायदेशी परत या’ म्हणत, ट्विटर-मेटामधून काढलेल्या कर्मचाऱ्यांना ‘हा’ भारतीय CEO देणार नोकरी!

105

ट्विटर, मेटामधून मोठ्या कर्मचारी कपातीनंतर आता भारतीय सीईओ हर्ष जैन पुढे सरसावल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेत मोठ्या कर्मचारी कपातीनंतर नोकरीवरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अमेरिकेत तब्बल ५२ हजारांहून अधिकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला पण यापैकी काही भारतीय देखील होते. या भारतीय कर्मचाऱ्यांनी आपल्या मायदेशी परत यावे आणि पुढील दशकात भारतीय तंत्रज्ञान प्रगत करण्यास मदत करावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.

(हेही वाचा – Whatsapp वर सुद्धा येणार Do Not Disturb फीचर, युजर्सना असा होणार फायदा)

ड्रीम स्पोर्टस नेहमीच टॅलेटच्या शोधात असतात विशेषतः डिझाईन, उत्पादन आणि तंत्रज्ञानातील नेतृत्वाचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना चांगली संधी उपलब्ध करून देण्याची तयारी आहे. सध्या टेक लेऑफमुळे जगभरातील हजारो कर्मचाऱ्यांना नारळ दिले. अमेरिकेतील घटणारी कमाई, कमी जाहिरातदार आणि निधी यामुळे अनेक टेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कपात करण्याचा मार्ग निवडला आहे. मेटाला तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेटाने या वर्षी कंपनी मूल्याच्या जवळपास ७० टक्के रक्कम पाण्यासारखी खर्च केली आहे. कंपनीचे मार्केट कॅप ट्रिलियन डॉलर्सवरून २५५.७९ अब्जपर्यंत डॉलरपर्यंत घसरले आहे.

कोण आहेत हर्ष जैन

भारतीय कंपनी ड्रिम ११ चे हर्ष जैन हे सीईओ आहे. त्यांनी आपल्या भारतीय कंपन्या नफ्यात असल्याचा दावा केला असून या कंपनीत १५० दशलक्ष युजर्स असलेली ८ अब्ज डॉलरची नफा कमावणारी कंपनी आहोत. Fantasy Sports, NFT, Sports OTT, Fintech मधील 10 kickass पोर्टफोलिओ कंपन्या आहोत. ड्रिम ११ हे एक फँटसी गेम प्लॅटफॉर्म आहे, जे युझर्सना क्रिकेट, फुटबॉल, हॉकी आणि बर्‍याच गोष्टींमध्ये फॅटन्सी संघ तयार करण्याची संधी उपलब्ध करुन देते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.